वयाच्या १७ व्या वर्षी त्यांनी स्वंतत्र वादन केले होते. ते ऑल इंडिया रेडिओचे ‘ए’ दर्जाचे कलाकार होते. हिंदराज दिवेकर, श्रीकांत पाठक, रामचंद्र व्ही हेगडे आणि ज्योती हेगडे हे त्यांचे काही प्रसिद्ध विद्यार्थी आहेत. बिंदू माधव पाठक हे कर्नाटक विद्यापीठाच्या संगीत विभागाचे प्रमुख म्हणून निवृत्त झाले. […]
साहित्याच्या ओढीने त्यांनी राजकारणही सोडले. त्यांचे तराळ-अंतराळ हे आत्मचरित्र. बारा बलुतेदार, तडीपार, सांगावा, गाव-शीव इ. लिखाण. आज इथं तर उद्या तिथं हा ललितलेखसंग्रह. टिटवीचा फेरा, सुटका, दौण्डी, आडगावचे पाणी इ. कथासंग्रह. हातभट्टी, गावचा टिनपोल गुरुजी, झोपडपट्टी, मसालेदार गेस्ट हाऊस, फूटपाथ नंबर १, माझं नाव इ. कादंबऱ्या प्रकाशित आहेत. […]
संजय भाकरे यांनी अनेक नाटकातून साकारलेल्या भूमिका रसिकांच्या स्मरणात आहेत. राज्य नाट्य स्पर्धेत अभिनयाची अनेक पदके त्यांना लाभली आहे. अघोर, ओली रे माती, मन उदास आदी चित्रपटातून त्यांनी भूमिकाही केल्या आहेत. संजय भाकरे यांचे स्वत:चे ‘संजय भाकरे फाउंडेशन’ असून संजय भाकरे फाऊंडेशन च्या माध्यमातून दर महिन्यात एकांकिका सादर करण्याचे व त्या माध्यमातून नवीन कलावंतांना व्यासपीठ मिळवून देण्याचे काम व नाटकांच्यासाठी नवी पिढी तयार करण्याचे कार्य २०१४ पासून सुरू आहे. […]
‘पंचकन्या’ हा त्यांचा एक प्रयोग, ज्यामध्ये त्या स्वतःच्या कविता, सद्यस्थितीतील सामाजिक प्रश्न व नृत्य एकत्र गुंफून रंगमंचावर एकल सादरीकरण करतात. भरतनाट्यम शैलीशी कुठेही तडजोड न त्या पंचकन्या हा सादर करतात. तसेच कमलपुष्पाचे वाङ्मयीन सौंदर्य आणि वेगवेगळ्या छायाचित्रांचे संकलन करून डॉ. प्रकाश जोगळेकर यांनी ‘पद्मिनी’ हे पुस्तक लिहिले आहे. […]
१९६२ मध्ये कोफी अन्नान यांनी जागतिक आरोग्य संघटनेत बजेट अधिकारी म्हणून काम सुरू केले. तिथे ते ३ वर्षे कार्यरत होते. १९६५ ते १९७२ या कालावधीत त्यांनी इथियोपियाची राजधानी असलेल्या आदीस अबाबा येथे संयुक्त राष्ट्रांच्या इकॉनॉमिक कमिशन फॉर अफ्रिकेसाठी काम केले होते. संयुक्त राष्ट्र संघाचे महासचिव बनणारे आफ्रिकन वंशाचे ते पहिले नागरिक होते. १९९७ आणि २००६ मध्ये सलग दोन वेळा त्यांनी संयुक्त राष्ट्र संघाचे महासचिवपद भूषवले होते. महासचिव असताना २०१५ पर्यंत जगातील गरिबी दूर करण्याचे उद्दिष्टही त्यांनी समोर ठेवले होते. युद्ध काळात शांतता प्रस्थापित करण्याबरोबरच युद्धात होरपळलेल्या जनतेचे पुनर्वसन करण्याचे काम त्यांनी केले होते. […]
२०१९ मध्ये गिरीश नातू यांनी प्रतिष्ठीत अशा 10 बीडब्ल्यूएफ रेफरीच्या ऑगस्ट ग्रुप मध्ये प्रवेश केला आहे. तसेच त्यांनी बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाचे टेक्निकल डायरेक्टर म्हणून काम केले आहे. […]
पेशवे उद्यानातल्या फुलराणीचे उद्घाटन ८ एप्रिल १९५६ ला पुण्यातील पूर्व प्राथमिक शाळेतील तेव्हाची विद्यार्थिनी वसुंधरा डांगे हिच्या हस्ते झाले. (पुढे त्या वाचकप्रिय लेखक सुहास शिरवळकर यांच्या पत्नी झाल्या.) इंजिन आणि दोन डबे अशी ‘फुलराणी’ची रचना होती. या रेल्वेसाठी दोन फलाट, तिकीट विक्रीची खिडकी, तिकीट तपासनीस, सिग्नल अशी सारी व्यवस्था उभारण्यात आली होती. लहानग्यांच्या करमणुकीसाठी उद्यानात चालविल्या जाणाऱ्या गाड्यांमध्ये पुण्यातली ‘फुलराणी’ देशातली सर्वात जुनी रेल्वे आहे, हे विशेष. […]
निवडणुकीच्या माध्यमातून सर्वोच्च पदापर्यंत पोहोचलेल्या युरोपातील पहिल्या महिला. इंदिरा गांधी, सिरिमाओ भंडारनायके आणि मार्गारेट थॅचर या एकाच वेळी आपापल्या देशाच्या सर्वोच्च स्थानी होता. या तिघींचे मैत्रीसंबंध हाही त्यावेळी चर्चेचा विषय असे. एका रशियन पत्रकाराने त्यांना ‘पोलादी महिला’ म्हणून संबोधले आणि याच विशेषणाने त्या पुढे ओळखू जाऊ लागल्या. […]
संगीतकार श्रीधर फडके यांच्याशी त्यांचे विशेष सूर जुळले होते. या जोडीची ‘फुलले रे क्षण माझे फुलले’, ‘मी राधिका, मी प्रेमिका’, ‘कधी रिमझिम झरणारा आला ऋतू आला’ इत्यादी गाणी खूप लोकप्रिय झाली. […]