नवीन लेखन...

या सदरातील व्यक्तिचित्रे केवळ मराठी माणसाचीच नाहीत.. तर भारतातल्या आणि जगातल्याही कर्तृत्ववान माणसांची व्यक्तिचित्रे येथे नियमितपणे वाचा..

ज्येष्ठ कवयित्री व लेखिका अनुराधा पाटील

गेली जवळपास पन्नास वर्षे त्या व्रतस्थपणे कविता लिहितायत. या पन्नास वर्षांत त्यांचे पाच कवितासंग्रह प्रकाशित झाले आहे. ‘दिगंत’ (१९८१), ‘तरीही’(१९८५), ‘दिवसेंदिवस’(१९९२), ‘वाळूच्या पात्रांत मांडलेला खेळ’(२००५) आणि ‘कदाचित अजूनही’(२०१७). या संग्रहांतून प्रामुख्याने आत्मपर कविता आलेली आहे. या कवितेचा केंद्रबिंदू विशेषत्वाने स्त्रीच राहिलेली आहे. […]

कवी, शाहीर, गीतकार राम उगावकर

कवी, शाहीर, गीतकार राम उगावकर यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील उगाव या गावी झाला. नाशिक जिल्ह्यातील येवला येथील जनता विद्यालयात उगावकर यांनी काही वर्षे शिक्षक म्हणून नोकरी केली. पुढे बृहन्मुंबई महापालिकेच्या शाळेतही त्यांनी शिक्षक म्हणून काम केले. राम उगावकर हे आदर्श शिक्षक, कवी, शाहीर, गीतकार होते. ते सेवादलातही काम करत असत. वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज हे […]

बडोद्याचे महाराज फतेहसिंग प्रतापराव गायकवाड

रणजी स्पर्धेत खेळणारे लोकसभेचे ते एकमेव खासदार होते. फतेहसिंग गायकवाड हे १९५७ ते १९६२, १९६२ ते १९६७, १९७१ ते १९७७ व १९७७ ते १९८० पर्यत कांग्रेस पक्षाचे बडोद्याचे सांसद होते. भारतातील टीव्हीवर समालोचन करण्याचा पहिला मानही त्यांना जातो. […]

भारताचे पहिले क्रिकेटपटू रणजीतसिंह

रणजीतसिंह यांनी जुलै १८९६ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध इंग्लंडमध्ये पदार्पण केले आणि पहिल्या डावात १५४ धावा केल्या, या हंगामात त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये २७८० धावा केल्या आणि डब्ल्यूजी ग्रेसचा विक्रम मोडला होता.३०७ डोमेस्टिक सामन्यांत रणजीतसिंहजी यांनी २४ हजार ६२९ धावा फटकावल्या. त्यात ७२ शतके आणि १०५ अर्धशतकांचा समावेश आहे. […]

गायिका मुग्धा वैशंपायन

‘लिटिल चॅम्प’ या लोकप्रिय कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेली मुग्धा वैशंपायनने लिटिल चॅम्प या कार्यक्रमात आपल्या आवाजाने प्रेक्षकांना अक्षरशः मोहून टाकले होते. या कार्यक्रमात मुग्धा सर्वात तरुण सदस्य होती आणि सर्वांनी त्याला ‘लिटल मॉनिटर’ म्हणून संबोधले होते. […]

सुप्रसिद्ध लेखक, निर्माता अजेय झणकर

‘दोहपर्व’ कादंबरीवर ‘सिंग्युलॅरिटी’ हा हॉलिवूड चित्रपट तयार झाला. मराठी लेखकाच्या साहित्यकृतीवर बेतलेला हा पहिलाच हॉलिवूड चित्रपट ठरला. ‘बटरफ्लाइज ऑफ बिल बेकर’ या रहस्यप्रधान चित्रपटाचे दिग्दर्शन झणकर यांची कन्या सानिया झणकर यांनी केले होते. चित्रपटाची कथा झणकर यांची होती. हॉलिवूडमधील मॅनहटन महोत्सवात हा चित्रपट उल्लेखनीय ठरला होता. […]

ज्येष्ठ व्हायोलिन वादक भालचंद्र देव

असेच एकदा त्यांच्या क्लासच्या गुरुपौर्णीमेच्या कार्यक्रमात यांनी दुर्गा राग वाजवीत होते. इतक्यात जवळच राहणारे प्रसिध्द संगीततज्ञ सरदार आबासाहेब मुजूमदार त्या ठिकाणी हजर झाले. भालचंद्र चे वादन संपल्यावर ते गुरुजींना म्हणाले, `वा! बबनराव हे रत्न तुम्ही कुठून पैदा केलेत.. ? एका थोर जाणकाराकडून भालचंद्र यांना मिळालेली ती पहिली पावती शाबासकी होती. […]

ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाईक

डॉ. जब्बार पटेल दिग्दर्शित ‘सामना’ या चित्रपटाद्वारे उषा नाईक यांनी चित्रपटक्षेत्रात पाऊल ठेवले. ‘सख्या रे घायाळ मी हरणी’ हे या चित्रपटातले गीत त्यांच्यावरच चित्रित झाले होते. उषा नाईक यांनी लहान वयापासून शास्त्रीय नृत्याचे धडे घेतले. त्यामुळे अभिनेत्रीबरोबर नृत्यांगना म्हणूनही त्यांची ओळख तयार झाली. […]

अनेक नाट्य कंपनीचे सूत्रधार व नाट्यनिर्माता गोट्या सावंत

नेपथ्य, कपडेपट, प्रकाशयोजना, संगीत, लेखन, अभिनय, नाट्य कंपनीचे सूत्रधार ते नाट्यनिर्माता या साऱ्या आघाड्यांवर गोट्या सावंत यांनी काम केलं आहे. ‘वाऱ्यावरची वरात’ या नाटकापासून सावंत यांनी सूत्रधाराची भूमिका वठवायला सुरुवात केली. त्यांनी त्यांच्याकडे रंगनिल, तृप्ती, जगदंबा, स्वरा मंच, सिने मंत्र, त्रिकुट, जॉय कलामंच, विन्सन अशा काही निर्मिती संस्थाच्या साठी काम केले आहे. […]

नकलाकार गोपाळ विनायक भोंडे

गोपाळ विनायक भोंडे लोकमान्य टिळक, भालाकार भोपटकर, शि. म. परांजपे, स्वातंत्र्यवीर सावरकर, रँग्लर परांजपे, लोकनायक बापूजी अणे, बॅ. जम्नादास मेहता, रँग्लर परांजपे अशा अनेकांच्या हुबेहूब नकला करत असत. लोकमान्यांसारखीच वेशभूषा करून ते मंचावर येत, आणि लोकमान्यांच्या आवाजात, बोलण्याच्या लकबीत त्यांनी पूर्वी केलेल्या भाषणाची नक्कल करीत. […]

1 61 62 63 64 65 392
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..