नवीन लेखन...

या सदरातील व्यक्तिचित्रे केवळ मराठी माणसाचीच नाहीत.. तर भारतातल्या आणि जगातल्याही कर्तृत्ववान माणसांची व्यक्तिचित्रे येथे नियमितपणे वाचा..

मालवणी नटसम्राट मच्छिंद्र कांबळी

मच्छिंद्र कांबळी यांना वस्त्रहरण हे नाटक लंडनला न्यायचे होते. पण पुरेसे पैसे नव्हते. त्यावेळी त्यांनी डॉ. काशिनाथ घाणेकर, नाना पाटेकर, अशोक सराफ, सचिन अशा बडया कलाकारांना घेऊन षण्मुखानंद मध्ये वस्त्रहरणचा विशेष प्रयोग केला. त्यानंतर वस्त्रहरणचा लंडनला प्रयोग केला. मच्छीँद्र कांबळी यांचे आणि मालवणी भाषेचा झेँडा सातासमुद्रापार पोहोचविणारे वस्त्रहरण हे पहिले मालवणी नाटक. […]

संघाचा खंदा कार्यकर्ता विनय चित्राव

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ,भारतीय जनता पार्टी यांच्या कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता. भाजपाचे खूप मोठे नेते विनयला व्यक्तिशः ओळखत होते पण विनयनं एका पैश्याचाही स्वार्थ कधी साधला नाही. गाणं शिकवणं आणि प्रिटींगची कामं या दोन व्यवसायातूनच त्यानं चरितार्थ चालवला. […]

कर्नाटकातील सिद्धगंगा मठाचे मठाधीश शिवकुमार स्वामी

१९६५ मध्ये कर्नाटक विद्यापीठाने त्यांना मानद डॉक्टरेट पदवी प्रदान केली होती. त्यांना २००७ मध्ये कर्नाटक रत्न पुरस्काराने तर २०१५ मध्ये पदमभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले होते. सिद्धगंगा मठाची सिद्धगंगा एज्युकेशन सोसायटी ही शिक्षण संस्था कर्नाटकात सुमारे १२५ शैक्षणिक संस्था चालविते. कर्नाटकातील राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज व्यक्ती शिवकुमार स्वामींचे भक्त आहेत. […]

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एन. के. पी. साळवे

व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट असलेल्या साळवेंचा आंतरराष्ट्रीय अर्थकारणापासून जागतिक करव्यवस्थेपर्यंत गाढा अभ्यास होता. भारत हा सर्वाधिक करवसुली करणारा देश आहे, असे त्यांचे मत होते. इन्कम टॅक्स व प्रॉपटी टॅक्स कमी झाले पाहिजेत, याविषयी ते आग्रही होते. इंदिरा गांधी यांच्या कारकिदीर्त साळवे यांच्या अध्यक्षतेखालील संसदेच्या संयुक्त समितीच्या शिफारशींनुसार, १९७५ साली भारतीय कर व्यवस्थेत महत्त्वाचे बदल झाले. […]

ज्येष्ठ अभिनेत्री शांता मोडक

सौंदर्य, अभिनय आणि गायन या माध्यमातून रंगभूमीसह चित्रपटसृष्टीचा पडदा गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री शांता मोडक यांचा जन्म १ एप्रिल १९१९ रोजी पुणे येथे झाला. शांता मोडक यांनी पुण्यात शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यांनी सर परशुरामभाऊ महाविद्यालयांमधून १९४२ मध्ये कला शाखेची पदवी मिळवली होती. ‘चूल आणि मूल’ चित्रपटाच्या माध्यमातून शांता मोडक यांनी रुपेरी दुनियेत पाऊल ठेवले. विश्राम बेडेकर […]

लोकसंस्कृतीच्या ज्येष्ठ अभ्यासक तारा भवाळकर

तारा भवाळकर या लोकसाहित्याच्या अभ्यासक आणि समीक्षक म्हणून प्रसिद्ध आहेत. लोकसंस्कृती आणि लोककला यांचा त्यांनी गाढा अभ्यास केला आहे. ‘मराठी पौराणिक नाटकांची जडणघडण’ या विषयात त्यांनी डॉक्टरेट मिळवली आहे. त्यांनी मराठी वाङ्मय कोश, तसंच मराठी विश्वकोशासाठी लेखन केलं आहे.तारा भवाळकर या लोकसाहित्याच्या अभ्यासक आणि समीक्षक म्हणून प्रसिद्ध आहेत. लोकसंस्कृती आणि लोककला यांचा त्यांनी गाढा अभ्यास केला आहे. ‘मराठी पौराणिक नाटकांची जडणघडण’ या विषयात त्यांनी डॉक्टरेट मिळवली आहे. त्यांनी मराठी वाङ्मय कोश, तसंच मराठी विश्वकोशासाठी लेखन केलं आहे. […]

कथ्यक नृत्यांगणा व अभिनेत्री सुखदा खांडकेकर

‘धरा की कहानी’ या हिंदी मालिकेतही तिने काम केले आहे. संजय लीला भन्साळी यांच्या गाजलेल्या बाजीराव मस्तानी या चित्रपटात सुखदाने काम केले आहे. या चित्रपटात बाजीरावांची बहिण अनुबाईंची भूमिका सुखदाने साकारली होती. […]

‘कुटुंब रंगलंय काव्यात’ चे विसूभाऊ बापट

मराठी साहित्य आणि साहित्यकारांना तसेच रसिकांना माहीत नसलेल्या हजारो कविता प्रा.बापटांनी मुखोद्गत केल्या आहेत. विविध वयोगटातील रसिक प्रेक्षकांना आनंद मिळेल याचे भान ठेवून प्रा.बापटांनी ह्या दुर्मिळ कवितांवर स्वरसाज चढविला. […]

भारतीय बुद्धिबळ खेळाडू कोनेरू हंपी

२००५ मध्ये १० बुद्धिमान महिला खेळाडूंविरुद्धच्या नॉर्थ उरलस कप स्पर्धेतही तिने बाजी मारली. २००६ मध्ये दोहा येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत तिने सुवर्णपदक तर जिंकलेच, शिवाय आणखी एक सुवर्णपदक तिने मिश्र सांघिक गटातही जिंकले. त्यानंतर २०१५ ला चीनमधली चेंगडू इथे भरलेल्या महिला सांघिक बुद्धिबळ स्पर्धेत तिने कांस्य पदक मिळवले. २०१९ मध्ये ती जागतिक रॅपिड चॅम्पियन ठरली. […]

दरबार ब्रासबॅण्डचे इक्बाल दरबार

इक्बाल दरबार यांनी यूके, यूएई, सिंगापूर, मॉरिशस, मालदीव, फ्रान्स इत्यादी ठिकाणी नौशाद कल्याणजी-आनंदजी, लक्ष्मीकांत-प्यारेलाल ओ.पी नय्यर, आरडी बर्मन, श्रीकांत ठाकरे यांच्या सारख्या भारतीय चित्रपटसृष्टीतील बहुतेक सर्व नामांकित संगीत दिग्दर्शकांच्या समवेत त्यांच्या मैफिलीच्या वेळी साथ दिली आहे. इक्बाल दरबार हे पुणे आकाशवाणी वरील ‘ए’ ग्रेड कलाकार आहेत. त्यांनी पुणे आकाशवाणी वरील मालिका, नाटक आणि चित्रपटांसाठी संगीत आणि शीर्षक ट्रॅक दिले आहेत. […]

1 63 64 65 66 67 392
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..