श्रेष्ठ क्रिकेटपटू पॉली उम्रीगर
पहिले द्विशतक ठोकणारा भारतीय फलंदाज होण्याचा मानही त्यांनाच मिळाला. न्यूझीलंडविरोधात त्यांनी द्वीशतक ठोकले होते. […]
या सदरातील व्यक्तिचित्रे केवळ मराठी माणसाचीच नाहीत.. तर भारतातल्या आणि जगातल्याही कर्तृत्ववान माणसांची व्यक्तिचित्रे येथे नियमितपणे वाचा..
पहिले द्विशतक ठोकणारा भारतीय फलंदाज होण्याचा मानही त्यांनाच मिळाला. न्यूझीलंडविरोधात त्यांनी द्वीशतक ठोकले होते. […]
निल धारकर यांनी देबोनायर, मिड-डे, संडे मिड-डे, द इंडीपेंडेंट व द इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया मध्ये काम केले होते. अनिल धारकर हे दरवर्षी नोव्हेंबर मध्ये मुंबईत होणाऱ्या लोकप्रिय मुंबई इंटरनॅशनल लिटररी फेस्टिव्हलचे संस्थापक होते. दक्षिण मुंबईत आर्ट मुव्ही थिएटर (आकाशवाणी सभागृहात) सुरू करण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. […]
बाबूराव बागुल हे दलित लेखकांमधले प्रमुख साहित्यिक. शोषितांच्या आणि पददलितांच्या जीवनावर त्यांनी भेदक लिखाण केलं आहे. ‘धारावीत भरलेल्या पहिल्या विद्रोही साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. बुद्धिप्रामाण्यवादी आणि परिवर्तनवादी असणाऱ्या बागुल यांनी अण्णा भाऊ साठ्यांच्या व्यक्तिमत्त्वाने प्रभावित होऊन कामगार चळवळीत कार्यकर्ता म्हणून योगदान दिलं. […]
ज्येष्ठ नाट्य समीक्षक, विचारवंत प्रा. पुष्पा भावे यांचा जन्म २६ मार्च १९३९ रोजी मुंबई येथे झाला. एक विचारवंत लेखिका, नाटक आणि रंगभूमी विषयी भरपूर लेखन आणि टीकात्मक समीक्षा करणार्याव लेखिका म्हणून पुष्पा भावे ओळखल्या जात. मुंबईतल्या मध्यमवर्गीय कुटुंबात पुष्पा भावे यांचा जन्म झाला. माहेरच्या त्या पुष्पा सरकार. उत्कृष्ट लेखनाबरोबर त्या एक सामाजिक कार्यकर्त्या म्हणून ही प्रसिद्ध […]
आनंद शंकर यांनी १९६० च्या दशकात लॉस एंजेलिसचा दौरा केला. येथे त्यांनी रॉक संगीतकार ‘जिमी हेंड्रिक्स’ सारख्या पाश्चात्य संगीत दिग्गजांसोबत काम केले. वयाच्या अवघ्या २७ व्या वर्षी १९७० साली त्यांचा पहिला संगीत अल्बम प्रसिद्ध झाला. इथेच त्यांनी सतारीवर आधारित ‘रोलिंग स्टोन्स’, ‘जम्पिन जैक फ़्लैश’ व ‘लाइट माय फायर’ यासारख्या वेस्टर्न हीट केल्या की ज्या खूप लोकप्रिय झाल्या. […]
तीन दुकानांची आठवण देणारी तीन टिंबे, तीन डॉट्स डॉमिनोजच्या लाल, निळ्या लोगोवर अवतरली. मुळात सुरुवातीला गडद लाल, निळा व शुभ्र पांढरा रंग वापरण्यामागे लोकांचं लक्ष वेधणं हा हेतू होता. हे तीन रंग खूप प्रामुख्याने दिसतात हे लक्षात घेऊन ते निवडताना तीन दुकानांची आठवण तीन टिंबांसह लोगोवर उमटली. […]
१९३८मध्ये त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात चित्रपटांचे पोस्टर करण्यापासून झाली. मेट्रो गोल्डविन मेयर कंपनीची पोस्टरे त्या वेळी अमेरिकेतून येत असत. ही पोस्टरे इथेच तयार करू शकेल अशा भारतीय चित्रकारांच्या शोधात कंपनी होती. त्यासाठी पंडित यांची निवड झाली. या कामासाठी तैलरंगाऐवजी अपारदर्शक जलरंगांचा (पोस्टर कलर) वापर पंडित यांनी सुरू केला. त्यांची कामे ‘मेट्रो’ सिनेमागृहाच्या शोकेसमध्ये झळकू लागली आणि रसिकांचे आकर्षण ठरू लागली. त्यानंतरच भारतामध्ये हिंदी चित्रपटांसाठीची पोस्टर निर्मिती सुरू झाली. […]
डॉ. राम मनोहर लोहिया, अच्युतराव पटवर्धन आणि पुरुषोत्तम त्रिकमदास यांच्यासह अनेक नेत्यांनी गुप्त काँग्रेस रेडिओला मदत केली. रेडिओ प्रसारणाने गांधी आणि भारतातील इतर प्रमुख नेते यांच्याकडून संदेश पाठविला. अधिकार्यांना रोखण्यासाठी,आयोजकांनी स्टेशन जवळजवळ दररोज स्थानांतरित केले. या रेडिओ स्टेशनवरून इंग्रजांनी सेन्सर केलेल्या सगळ्या बातम्या लोकांपर्यंत पोहोचविण्यात येत असत. गांधीजींना अटक झालेली आहे, काँग्रेसचे इतर लोक जेलमध्ये आहेत, मेरठमध्ये सैनिकांनी उठाव केला त्यामध्ये 300 सैनिक मारले गेले. अशा अनेक बातम्या त्यावेळी या सिक्रेट रेडिओने लोकांपर्यंत पोहोचवल्या. […]
अरुण होर्णेकरांनी आजवर ‘दिवा जळू दे सारी रात’सारख्या मेलोड्रामापासून ‘हैदोस’, ‘भोगसम्राट’सारख्या हिट् ॲण्ड हॉट नाटकांपर्यंत.. आणि ‘बेकेट’,‘वेटिंग फॉर गोदो’, ‘गिधाडे’ सारख्या ॲटब्सर्ड, प्रश्नयोगिक, तसंच वास्तववादी नाटकांपासून ते ‘सख्खे शेजारी’सारख्या रेव्ह्यू प्रकारातल्या नाटकांपर्यंत सगळ्या पिंड-प्रकृतीची आणि प्रवृत्तीची नाटकं केली आहेत. […]
केचे ह्यांना आपल्या हयातीत १९८४ ला महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक राज्य पुरस्कार प्राप्त झाला, १९८५ मधे घाटंजी येथील ३७ व्या विदर्भ साहित्यसंमेलनाचे अध्यक्षपद त्यांना बहाल झाले. १९९० ला तेल्हारा येथील मराठी प्राध्यापक परिषदेच्या अध्यक्षपदाची यशस्वी धुरा त्यांनी सांभाळली. तसेच केचे हे महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे व महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार समितीचे सदस्य होते. अमरावती येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात निमंत्रितांच्या कविसंमेलनाचे अध्यक्षपदही त्यांच्याकडे होते. […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions