आपल्या या संवाद लेखनाचे इंगीत सांगताना, स्वत: दिनकरराव म्हणत, ‘मेळ्याचे संवाद लिहिताना संवाद लेखनाची गुरूकिल्ली सापडली. संवाद कलापथक-नाटक अथवा चित्रपटातले असोत, ते बोलीभाषेत लिहावेत, ऐकता क्षणीच प्रेक्षकांना कळलं पाहिजे. भालजी पेंढारकरांच्या साध्या-सोप्या-खटकेदार संवादाची छाया माझ्या संवादलेखनावर पडली आहे. त्यामुळे या क्षेत्रातले ते माझे गुरू आहेत.’ असे आवर्जून ते कबूल करताना आणि संवाद-लेखनाचे महत्त्व पटवून देताना गुरूबद्दलची कृतज्ञताही व्यक्त करत असत. […]
पु. ल. देशपांडे, न. र. फाटक, श्री. पु. भागवत वगैरे शिक्षकांमुळे राम पटवर्धन यांची वाङ्मयीन जाण चौफेर होत गेली. त्यांनी स्वत:देखील चेकॉव्हच्या काही कथांचे अनुवाद केले आणि ‘नाइन फिफ्टीन टू फ्रीडम’ ही कादंबरीही मराठीत आणली आहे. त्यामुळे ‘मौज’ साप्ताहिक आणि सत्यकथा हे मासिक मराठीतील सर्व नव्या लेखकांचे नव्या प्रयोगांचे केंद्र म्हणून मान्यता पावले. […]
बाळ गाडगीळ यांनी ६० हून अधिक पुस्तके लिहिली. त्यांच्या ’लोटांगण’ या पहिल्याच विनोदी कथासंग्रहाला पु.ल. देशपांडे यांच्या ‘अपूर्वाई’ या पुस्तकाबरोबर राज्य सरकारचा पुरस्कार विभागून मिळाला होता. ’एकच प्याला, पण कोण?’, ’अखेर पडदा पडला’, ’फिरकी’, ’वशिल्याचा तट्टू’ अशा अनेक पुस्तकांनाही लोकप्रियता मिळाली होती. सिगरेट व वसंतऋतू’ या त्यांच्या प्रवासवर्णनाला राज्य सरकारचे पहिले पारितोषिक मिळाले. […]
प्रसार माध्यमांमध्ये राहूनही स्वत: प्रकाशझोतात न राहता इतरांना प्रकाशझोतात आणण्याचा प्रयत्न वासंती ताईंनी सतत केला व करीत असतात. शेकडो जाहीर कार्यक्रमांचे सूत्रसंचालन त्यांनी केले आहे. विशेषत: साहित्य विषयक कार्यक्रमांचे सूत्रसंचालन करण्यात त्यांना विशेष आवड आहे. […]
मोहन तोंडवळकर यांचं वाचन उत्तम होतं. त्यामुळे संहितेतलं वेगळेपण त्यांना लगेचच जाणवे. लेखकाच्या प्रभावी नाटय़वाचनाला भुलून त्यांनी कधीच नाटकं स्वीकारली नाहीत. याबाबतीत ते स्वत:व्यतिरिक्त दुसऱ्या कुणावरही सहसा विसंबले नाहीत. नाटकाच्या बुकिंग प्लॅनवर एक नजर टाकली तरी त्यांना त्या नाटकाचं भवितव्य कळे. त्यामुळेच आपल्याला आवडलेलं नाटकही त्यांनी चालत नसताना कधी हट्टाग्रहानं सुरू ठेवलं नाही. […]
“मॅन ऑफ क्रायसिस’ हा किताब त्यांना ब्रिटिश वृत्तपत्रांनी दिला, यातच त्यांचे मोठेपण दिसून येते. एकनाथ सोलकर यांची कारकिर्द : २७ कसोटी १०६८ धावा, एक शतक, ६ अर्धशतके, १८ विकेट्स, ५३ झेल. ७ वनडे २७ धावा, ४ विकेट्स, २ झेल. १८९ प्रथम श्रेणी सामने, ६८९५ धावा, ८ शतके,३६ अर्धशतके, २७६ विकेट्स, १९० झेल. […]
१९९९ मध्ये शरद पवार यांनी राष्ट्रवादीची स्थापना केली. त्यावेळी रामराजेंनी राष्ट्रवादी सोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ते महसूल राज्यमंत्री झाले. २००४ मध्ये ते कॅबिनेट मंत्री व साताऱ्याचे पालकमंत्री झाले. […]
पाच वर्षांच्या अखंडित प्रयोगानंतर १८९७ मध्ये संपीडित हवेच्या तापमानाने इंधनाचे प्रज्वलन होत असलेले व पुढे दाब कायम राहून त्याचे ज्वलन होत असलेले इंजिन यशस्वीरीत्या तयार केले. हे दणकट इंजिन २५ अश्वशक्तीचे, उभ्या सिलडरचे, हवेच्या दाबाने इंधन तेलाचे अंत:क्षेपण होणारे, मंदगतीचे पण उच्च औष्णिक कार्यक्षमतेचे होते. रुडॉल्फ डिझेल हे १९७८ सालचे ऑटोमोटिव्ह हॉल ऑफ फेम’चे मरणोत्तर मानकरी ठरले होते. […]
लंडन ऑलिम्पिकच्या उद्घाटनाच्या दिवशीच, २९ जुलै १९४८ रोजी स्टोक मॅंडेविले हॉस्पिटल मध्ये युद्धामध्ये अपंग झालेल्या लोकांचे पहिले स्टोक मॅंडेविले गेम्स आयोजित केले होते. यामधील सर्व सहभागींना पाठीच्या कणाची दुखापत झाली होती. या सर्वांनी व्हीलचेअर्समध्ये भाग घेतला होता. आपल्या रूग्णांना राष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये भाग घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी लुडविग गुट्टमन यांनी ‘पॅराप्लेजिक गेम्स’ हा शब्द वापरायला सुरुवात केली. […]