नवीन लेखन...

या सदरातील व्यक्तिचित्रे केवळ मराठी माणसाचीच नाहीत.. तर भारतातल्या आणि जगातल्याही कर्तृत्ववान माणसांची व्यक्तिचित्रे येथे नियमितपणे वाचा..

भारतातील ‘द फर्स्ट वाईन लेडी’ अचला जोशी

अमेरिका वारीहून भारतात परतताना अचला यांनी वाइनइस्ट सोबत घेऊन भारतामध्ये प्रवेश केला. प्रवासादरम्यान वाइन कशी बनवितात, त्याचे फायदे-तोटे याविषयी पुस्तकी ज्ञान घेतल्यानंतर मुंबईतील एका रविवारच्या दुपारी अचला या माहेरी गेल्या असताना डॉक्टर भावाला आलेल्या भेट वस्तू मधील पाच किलो द्राक्षाच्या पेटीवर अचला यांची नजर गेली. द्राक्षपेटीतून पहिले द्राक्ष जिभेवर विरघळल्यानंतर अचला यांना अमेरिकेतील त्या रेडवाइनशी जुळत्या चवीचा अंदाज आला. माहेरवाशीण आई घरची ही द्राक्षपेटी स्वत:च्या घरात त्या घेऊन गेल्यावर त्यांच्या पतीने तेवढय़ाच तडफेने द्राक्षाची वाइन बनविण्यासाठी प्रोत्साहन दिले. […]

जीवटराम भगवानदास तथा आचार्य कृपलानी

आचार्य कृपलानी यांनी १९६३ मध्ये पहिल्यांदा जवाहरलाल नेहरु सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडला होता. भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील हा पहिला अविश्वास प्रस्ताव ठरला होता. हा प्रस्ताव ३४७ मतांनी फेटाळण्यात आला आणि नेहरु सरकारवर याचे परिणामदेखील झाले नव्हते. मात्र, पहिला प्रस्ताव म्हणून त्याची इतिहासात नोंद झाली. […]

भारताचे माजी यष्टिरक्षक नरेन ताम्हाने

नरेन ताम्हाणे यांनी आपल्या कसोटी क्रिकेट कारकीर्दीची सुरुवात १ जानेवारी १९५५ रोजी पाकिस्तानविरुद्ध केली होती. नरेन ताम्हाणे हे आपला शेवटचा कसोटी सामना ३० डिसेंबर १९६० रोजी पाकिस्तान विरुद्ध खेळले होता.
[…]

बुटिक कंपनीच्या सर्वे सर्वा माया परांजपे

सत्तरचे दशकभर त्यांनी सौंदर्य प्रसाधन, केशभूषा या विषयांतील विविध शास्त्रीय अभ्यासक्रम पूर्ण केले आणि १९७७ मध्ये त्यांना ‘ब्रिटिश असोसिएशन ऑफ ब्यूटी थेरपी अँड कॉस्मेटोलॉजी’चे सदस्यत्व मिळाले. हे पद मिळवणाऱ्या त्या दुसऱ्या भारतीय! त्यानंतरही त्या या क्षेत्रातील बदलती तंत्रे आत्मसात करत होत्या. मग ते केशभूषा तंत्र असो, अरोमाथेरपी असो वा हॉट स्टोन थेरपीसारखी अद्ययावत गुंतागुंतीची तंत्रे; ती जिथे उत्तमपणे शिकविली जात, अशा संस्थांतून त्यांचे शिकणे चालूच होते. […]

आधुनिक भास्कराचार्य विनायक लक्ष्मण ऊर्फ केरुनाना छत्रे

गहन विषयांच्या व्यासंगात गढलेल्या केरुनानांना शास्त्रीय संगीत, संगीत नाटके व स्वत: पियानो वाजवण्याची आवड होती. शिवाय किर्लोस्कर नाटक मंडळीत त्यांचा राबता होता. फार काय नाटकांच्या तालमींना हजर राहून ते मोरोबा वाघोलीकर आणि बाळकोबा नाटेकर या गायक नटांना गाण्याच्या अतिरेकानं नाटकाचा रसभंग होतो, असा सल्ला देत असत. त्यांच्या या गुणांवर लुब्ध होऊन अण्णासाहेब किर्लोस्करांनी आपले ‘सौभद्र’ हे नाटक त्यांना अर्पण केलेलं आहे. […]

ज्येष्ठ कवी, गीतकार डॉ. मुरलीधर गोडे

टीव्ही आणि आकाशवाणीसाठी त्यांनी तब्बल पन्नासच्यावर सुंदर जिंगल्स लिहिल्या. १९७७ मध्ये प्रदर्शित झालेला ‘बन्या बापू’ या मराठी चित्रपटाची सर्व गीते प्रचंड गाजली. ‘प्रीतीचं झुळझुळ पाणी’, ‘मी कशाला आरशात पाहू गं…’, ‘अरे ले लो भाई चिवडा लेलो’, ‘हे गर्द निळे मेघ, बिलगून जशी वीज’ ही चार गाणी उषा मंगेशकर, शैलेंद्र सिंग, अनुराधा पौडवाल यांनी गायलेली, तर संगीत दिले होते ऋषी-राज या संगीतकाराने. […]

स्विस अभिनेत्री उर्सुला एंड्रेस

उर्सुला एंड्रेस यांनी पहील्या जेम्स बॉन्ड चित्रपट डॉ नो मध्ये काम केले होते. त्यांचे द सदर्न स्टार, फन इन अकापुल्को , शी , द 10 विक्टिम , द ब्लू मैक्स , परफेक्ट फ्राइडे , द सेंसफुल नर्स , द माउंटेन ऑफ कैनिबल गॉड , द फिफ्थ मस्कटियर, द फाइट ऑफ टाइटन, क्लैश ऑफ द टाइटन्स हे इतर चित्रपट आहेत. […]

भारतीय बॅडमिंटनपटू सायना नेहवाल

मार्च २०१२ मध्ये सायनाने स्वीस ओपन अजिंक्यपद स्पर्धा जिंकली आणि त्यानंतर जून २०१२ मध्ये थायलंड ओपन ग्रां प्री सुवर्ण सन्मान पटकावला. २०१२ लंडन ऑलिंपिक खेळात बॅडमिंटनमध्ये तिने कांस्य पदक जिंकले आहे. ऑलिंपिक खेळात बॅडमिंटनमध्ये कांस्य पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला आहे. […]

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण

माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधीच्या आग्रहाखातर पृथ्वीराज चव्हाण यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला. त्यांनी पंतप्रधान कार्यालयाचा कार्यभार समर्थपणे सांभाळला. केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्री या नात्याने त्यांनी अनेक पदांचा कार्यभार पाहिला आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान, संसदीय व्यवहार आणि पंतप्रधान कार्यालय ही त्यापैकी प्रमुख खाती होती. […]

पूर्व पाकिस्तानचे राजकारणी शेख मुजिबुर रहमान

मुजिबुर रहमान हे बांगलादेशचे प्रथम राष्ट्राध्यक्ष व नंतर प्रथम पंतप्रधान होते. मुजिबुर रहमान यांना बंगबंधू नावानेही संबोधत. भारताने मानवतेच्या दृष्टिकोनातून बांगलादेशाच्या मुक्तीसाठी लढाई केली. ती अगदी थोडक्यात, झटपट, कमीतकमी मनुष्यहानी करून केली त्याला इतिहासात तोड नाही. […]

1 69 70 71 72 73 392
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..