शिवसेनेच्या जुन्या फळीतील नेत्यांपैकी एक असणाऱ्या विनायक राऊत यांनी मुंबई महानगरपालिकेतून राजकीय कारकिर्दीला प्रारंभ केला. १९८५ मध्ये महानगरपालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून गेले. १९९२ पर्यंत विनायक राऊत पालिकेत होते. १९९९ साली विनायक राऊत विलेपार्ले मतदारसंघातून काँग्रेसच्या अशोक जाधव यांचा पराभव करुन विधानसभेवर निवडून गेले. […]
रामभाऊ म्हाळगी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक, जनसंघ या राजकीय पक्षाचे महाराष्ट्राचे पहिले सरचिटणीस आणि विधानसभेतील पहिले आमदार, तसेच भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्राचे पहिले प्रादेशिक अध्यक्ष होते. जनता पार्टीचे खासदार म्हणून १९७७ साली व १९८० साली ते ठाणे लोकसभा मतदार संघातून निवडून आले होते. पूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात प्रथमच जनसंघाची पताका फडकावणारी राम कृष्णाची जोडी होती ती आणीबाणीमध्ये फुटली (कृष्णराव भेगडे व रामभाऊ म्हाळगी ) कृष्णराव भेगडे कॉंग्रेस मध्ये गेले परंतु रामभाऊ अखेर पर्यंत जनसंघ– जनता पक्ष व शेवटी भाजपात राहिले त्यांचे साधी राहणीमान व नवीन उप्रकमाची शैली यामुळे ते राजकारणात आघाडीवर राहिले. […]
वडिलांनी विचारले मग तुला काय हवे आहे? उदय म्हणाले, मी फायनान्शियल कन्सल्टन्सी करेन.त्याच कार्यालयात ३०० चौ.फुटाची जागा त्यांना देण्यात आली. त्या काळात बँकेतील ठेवीदारांना ६ टक्के व कर्जावर १६.५ टक्के व्याज घेतले जात होते. त्यावेळी टाटाची एक कंपनी नेल्कोची आर्थिक बाजू पाहणाऱ्या एका व्यक्तीची त्यांची चर्चा झाली. नेल्को बाजारातून पैसा घेत होती. उदय यांनी आपल्या मित्राला हे काम पाहण्यास सांगितले. नेल्कोने त्यांना वित्त पुरवठा केला. १९८० मध्ये अनेक विदेशी बँकांनी भारतात शाखा सुरू केल्या. यातून त्यांना अनेक आर्थिक स्त्रोत मिळाले. […]
शिल्पकार, चित्रकार, कवी, वास्तुशिल्पी अशा अनेक भूमिकांमध्ये साऱ्या जगावर अमिट ठसा उमटविणाऱ्या ‘मायकेल अँजेलो’ या कलावंताची ही रोमहर्षक कहाणी! डॉ. माधवी मेहेंदळे यांनी लिहिलेल्या आणि अमेय प्रकाशनतर्फे प्रसिद्ध झालेल्या ‘दैवी प्रतिभेचा कलावंत : मायकेल अँजेलो’ या पुस्तकातील हा संपादित अंश! […]
उस्ताद अमीर खाँ साहेबांचा त्यांच्यावर चांगलाच प्रभाव होता. त्यांच्या सुगम संगीतातील लालित्य व शास्त्रीय संगीतातील बौद्धिक बाजू अप्पासाहेबांनी सांभाळली. संत ज्ञानेश्वरांच्या पसायदनाला त्यांनी दिलेली नवी चाल विशेष उल्लेखनीय ठरली. त्यांनी निर्मिलेल्या मधुप्रिया रागातील काही रचनाही प्रसिद्ध झाल्या आहेत. […]
त्यांच्या वडीलींचे मनोर, वाडा येथे त्यांच्या भजनी मंडळाचे कार्यक्रम होत असत. त्यावेळी पाच-सात वर्षांच्या असलेल्या पागधरे वडिलांबरोबर भाग घ्यायच्या. […]
१९६३ मध्ये ओटन्स यांचा कॅसेट टेपचा शोध हे जगभरात एक मोठे यश होते. १९६३ मध्ये शोध लावल्या पासून १०० अब्जाहूनही अधिक कॅसेट विकल्या गेल्या आहेत. परंतु सीडीच्या उदयानंतर या कॅसेटचा वापर कमी झाला. […]
देसाईंनी फक्त ऐतिहासिक साहित्य लिहिले असे नाही. ग्रामीण साहित्यातही त्यांचे मोठे योगदान आहे. सवाल माझा ऐका, रंगल्या रात्री या गाजलेल्या चित्रपटांच्या कथाही त्यांनीच लिहिल्या. […]
ईस्ट विंड, वेस्ट विंड ही पर्ल बक यांची पहिली कादंबरी १९३० मध्ये प्रसिध्द झाली. त्यानंतर प्रकाशित झालेल्या द गुड अर्थ (१९३१) ह्या कादंबरीने पर्ल बक यांना आंतरराष्ट्रीय कीर्ती प्राप्त करून दिली. भूमीवर प्रेम करणारा वांग लुंग हा कष्टाळू चिनी शेतकरी आणि त्याची बायको ह्यांची ही वास्तववादी कहाणी बायबलसारख्या साध्या, सोप्या शब्दात बक यांनी मांडली होती. १९३२ मध्ये या कादंबरीला ‘पुलिट्झर पारितोषिक’ मिळाले. […]
दादोजींनी देशमुखीतील तंटे मोडून त्यांना स्वराज्याच्या कामगिरीत एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. अनेक भांडणांचे निवाडे केले. दादोजी एक लहानसाच ब्राह्मण पण त्याने केलेले निवाडे औरंगजेबासही मान्य झाले, असे पहिल्या शाहूने त्याच्याविषयी उद्गार काढले आहेत. […]