नवीन लेखन...

या सदरातील व्यक्तिचित्रे केवळ मराठी माणसाचीच नाहीत.. तर भारतातल्या आणि जगातल्याही कर्तृत्ववान माणसांची व्यक्तिचित्रे येथे नियमितपणे वाचा..

जनसंघाचे नेते नानाजी देशमुख

चित्रकूटमधील खेडी स्वयंपूर्ण होण्यासाठी त्यांनी टप्प्याटप्प्याने प्रकल्प हाती घेतला. चित्रकूटमध्ये त्यांनी गोशाळा स्थापन केली असून महिला सक्षमीकरणासाठी उद्यमकेंद्राची स्थापना केली आहे. तसेच कृषी विज्ञान केंद्रातर्फे पिकांवर संशोधन केले जाते. पिकांचे कोणते वाण वापरावे याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाते. […]

हिंद केसरी मारुती माने

कोणत्याही क्षणैक वलयाच्या मागे न लागता माने यांनी आयुष्यभर कुस्ती हेच आपले ध्येय ठेवले आणि त्याप्रमाणेच ते वागत आले. लाल मातीमध्ये रंगून जाणाऱ्या या बलदंड माणसाच्या मनाचा एक कोपरा हळुवार होता आणि तो हळवेपणा त्यांच्या बासरीवादनातून व्यक्त होत राहिला. […]

अभिनेते अजय वढावकर

आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अभिनयाने छोट्या पडद्याच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेले अजय वढावकर यांनी मालीकाच्या बरोबर येस बॉस, फिर भी दिल है हिंदुस्थानी, इंग्लिश बाबू देसी मेम या हिंदी चित्रपटांमध्ये काम केले होते. दूरदर्शनवरील ‘नुक्कड’ मालिकेतील त्यांनी साकारलेला ‘गणपत हवालदार’ प्रेक्षकांच्या स्मरणात राहणारा ठरला. मुंबईतील दादर भागात लहानाचे मोठे झालेल्या वढावकर यांचा अंतकाळ हलाखीचा होता. मधुमेहामुळे पाच वर्षांपूर्वी त्यांना […]

ज्येष्ठ मराठी व हिंदी साहित्यिक ज्योत्स्ना देवधर

त्यांनी लिहिलेले ‘पंडिता रमाबाईंचे चरित्र’ हे चरित्र लिखाणाचे एक उत्तम उदाहरण आहे. त्यांचे लिखाण स्त्रीवादी आणि वास्तववादी होते. ज्योत्स्ना देवधर यांच्या कथांतून आपल्याला स्त्रीच्या वाट्याला येणारी दु:खे, वेदना, तिच्या जीवनातील कारुण्य यांचे चित्रण पहायला मिळते. […]

ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक, नाटककार व संपादक अदि मर्झबान

एल्फिन्स्टन महाविद्यालयात शिकत असताना त्यांनी थिएटरच्या क्षेत्रात करियरबद्दल गांभीर्याने विचार करण्यास सुरूवात केली. त्या काळात पेसी खंडवाला यांच्याशी झालेली भेट ही त्यांच्या कारकीर्दीतील एक महत्त्वाचा टर्निंग पॉईंट ठरली आणि नंतर दोघांनी एकत्र काम करून अनेक नाटके केले. […]

कथाकार आणि कादंबरीकार कुसुम अभ्यंकर

कुसुम अभ्यंकरांची दुसरी ओळख म्हणजे त्या रत्नागिरीच्या मतदारसंघातून १९७८ साली आमदार म्हणून निवडून आल्या. त्या काळात खेडोपाडी फिरून त्यांनी आपल्या मतदारांच्या अडीअडचणींकडे जातीने लक्ष पुरवले. उत्तम वक्तृत्वाची कला त्यांच्याजवळ होती. त्यामुळे माणसांशी संवाद साधून माणसे जोडण्याचे कसब त्यांनी साध्य केले होते. […]

कादंबरीकार सुरेश जनार्दन द्वादशीवार

आसाम-ईशान्येचा अशांत परिसर, वहीतल्या नोंदी, करुणेचा कलाम, अलकनंदा, हाकुमी, तांदळा, वर्तमान, कोहम्, एकशे अकरावी दुरुस्ती, राजधर्म, सारी माझीच माणसे, मन्वंतर समूहाकडून स्वतःकडे, सडेतोड, सेंटर पेज तारांगण, असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे. […]

अभिनेते व नेपथ्यकार राजन भिसे

दिग्दर्शक मंगेश कदम यांचे नाटक ‘अधांतर’. जयंत पवार यांचे ‘माझं घर’, प्रशांत दळवी यांचं ‘सेलिब्रेशन’ हे नाटक ‘लग्नाची बेडी’, ‘व्यक्ती आणि वल्ली’, ‘ढोलताशे’ अशी अनेक नाटके त्यांनी केली आहेत. अभिनय व नेपथ्य या बरोबरच सध्या अखिल भारतीय नाट्य परिषदेचे काम राजन भिसे बघत आहेत. […]

लेखक जयंत राळेरासकर

मित्र सुधीर पेशवे – हे तुळजापूरचे एक ध्वनिमुद्रिका संग्राहक. नळदुर्गच्या आठवडे बाजारात हिंडताना एका चहाच्या टपरीकडे त्यांचे लक्ष गेले. दोरीला लटकत असलेली “चहा – २५ पैसे” असे लिहिलेली ती वर्तुळाकार चीज एक रेकॉर्डच होती. कुणाची आहे म्हणून त्यांनी ती जवळ जाऊन पाहिली. सुधीर पेशवेंचा डोळ्यावर विश्वास बसेना. ती ध्वनिमुद्रिका होती विष्णुपंत पागनीस यांची. चित्रपट ‘संत तुकाराम’आणि गीत होते -आधी बीज एकले ! चार चहांची किंमत देवून त्यांनी ती हस्तगत केली. […]

चित्रपट पत्रकार, समीक्षक इसाक मुजावर

हिंदीप्रमाणे मराठी चित्रपटांवर त्यांनी प्रकाश टाकला. हिंदीमधीलदेखील राज कपूर, देव आनंद, बी. आर. चोप्रा यांच्यासह अनेक कलावंतांसोबत त्यांनी प्रत्यक्ष सेटवर जाऊन त्या काळी लिखाण केले. हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीतील निर्माते, दिग्दर्शक, नायक, नायिका, संगीतकार, गीतकार, विनोदी कलावंत, खलनायक या सर्वांसोबत त्यांची बातचीत आजही त्यांच्या ध्यानात आहे. […]

1 78 79 80 81 82 392
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..