नवीन लेखन...

या सदरातील व्यक्तिचित्रे केवळ मराठी माणसाचीच नाहीत.. तर भारतातल्या आणि जगातल्याही कर्तृत्ववान माणसांची व्यक्तिचित्रे येथे नियमितपणे वाचा..

मेजर थॉमस कँडी

ईस्ट इंडिया कंपनीच्या नोकरीत असलेले थॉमस त्यांच्या आयुष्याची शेवटची पंचावन्न वर्षे भारतातच राहिले. संस्कृत, मराठी या भाषांचा, त्यांच्या व्याकरणाचा आणि तत्कालीन प्रचलित बोली मराठीचा सखोल अभ्यास केलेल्या थॉमस कँडी यांनी भावाच्या मदतीने कॅप्टन मोल्सवर्थचे अर्धवट राहिलेले इंग्रजी-मराठी शब्दकोशाचे काम पूर्ण केले. […]

स्वातंत्र्यवीर सावरकर

मॉर्सेलिस येथे उडी मारताना सावरकरांनी सखोल विचार केला होता. दोन देशांतील कैदी हस्तांतरण किंवा अन्य तत्सम करारांचा मुद्दा त्यांच्या मनात होता. फ्रान्सच्या भूमीवरून ब्रिटिश पोलीस त्यांना पकडू शकणार नाहीत असा त्यांचा अंदाज होता. पण तसे घडले नाही. मरणप्राय वेदना सहन करीत असतानाही त्यांच्या डोळ्यासमोर एकच ध्येय होते, मातृभूचे स्वातंत्र्य !!! […]

क्रिकेटला डकवर्थ-लुईस हा नियम देणारा टोनी लुईस

लुईस आणि डकवर्थ यांनी १९९७ मध्ये एक फॉर्म्युला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला सादर केला.१९९७ साली झिमाब्वे आणि इंग्लंडदरम्यानच्या सामन्यात हा नियम पहिल्यांदा वापरण्यात आला. १९९९ मध्ये याचा वापर इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड कपमध्ये करण्यात आला. […]

आक्रमक फलंदाज फारुख इंजिनिअर

मद्रासमधल्या त्या कसोटीत पहिल्या दिवशीच्या उपाहारापर्यंतच्या खेळातच टिकाकारांची तोंडे गप्प झाली होती. दिलिप सरदेसाईसोबत फारुख इंजिनिअर सलामीला आला होता आणी सलामीच्या पहिल्याच डावात त्याने वेस्ली हॉल, चार्ली ग्रिफिथ, दस्तुरखुद्द सोबर्स आणी लान्स गिब्ज ह्यांचे डोळे पांढरे केले होते. उपाहारावेळी तो ९४ धावांवर नाबाद होता आणी संघाच्या धावा होत्या बिनबाद १२५. […]

जैन उद्योग समुहाचे संस्थापक भवरलाल जैन

भंवरलाल जैन यांनी मराठी, इंग्रजी भाषेत अनेक पुस्तके लिहिली. त्यांचे ‘ती व मी’ हे पत्नीवर लिहिलेले पुस्तक वाचकांच्या पसंतीस उतरले. निसर्गकवी ना. धों. महानोर हे त्यांचे बांधभाऊ होते. राजकीय क्षेत्रात त्यांचे अनेक नेत्यांच्या बरोबर त्यांचे स्नेहाचे संबंध होते किंबहुना सर्वच राजकीय पक्षांच्या अनेक नेत्यांशी त्यांची मैत्री होती. […]

जलतरंगवादक मिलिंद तुळाणकर

जलतरंग हे प्राचीन भारतीय वाद्य असून ते वाजविणाऱ्या व्यक्ती दुर्मीळ आहेत. ‘ही ६४ कलांमधील एक कला आहे. या वाद्याला जलवाद्य किंवा ‘जलतंत्री वीणा’ असेही म्हणतात. यात कमीतकमी १२, तर जास्तीत जास्त २६ भांडी असतात. भांड्यांची रचना मोठ्यापासून छोट्यापर्यंत, अर्धवर्तुळाकार स्वरूपात केली जाते. बांबूच्या किंवा प्लास्टिकच्या काठ्यांनी ते वाजवितात. […]

मराठीतील बालवाङ्मफयाचे जनक विनायक कोंडदेव ओक

१८८१ साली मुलांसाठी बालबोध या नावाचे एक मासिक काढून त्यातून त्यांनी चरित्रे, कविता, निबंध, शास्त्रीय विषयांवरील लेख इ. विविध प्रकारचे लेखन वैपुल्याने केले व मराठी बालवाङ्मलयाचा पाया घातला. […]

ॲ‍पलचे संस्थापक सदस्य व माजी अध्यक्ष स्टीव्ह जॉब्स

जन्म. २४ फेब्रुवारी १९५५ ग्रीन बे अमेरिका येथे. सिरीयाचा मुस्लिम विद्यार्थी अब्दुल फतेह जॉन जंदाली व जोआन शिबिल यांनी विवाहाआधी जन्मलेले मूल अनाथालयाला दिले होते. त्यासाठी त्यांची एकच अट होती. त्यांचे मूल दत्तक घेणारे कुटुंब हे सुशिक्षित असले पाहिजे. कॅलिफोर्नियातील पॉल व क्लरा जॉब्स या आर्मिनियन कुटुंबाने त्यांचे मूल दत्तक घेण्याचा प्रस्ताव मान्य केला. जॉन – […]

छत्रपती राजाराम महाराज

छत्रपती राजाराम महाराजांचा जन्म २४ फेब्रुवारी १६७० रोजी झाला. संभाजी महाराजांच्या मृत्यूसमयी राजाराम महाराज यांचे वय अवघे १९ वर्षांचे होते. राजाराम महाराजांच्या वाट्याला फक्त तीस वर्षांचे आयुष्य आले. वयाच्या एकोणीसाव्या वर्षी स्वराज्य रक्षणाची जबाबदारी त्यांच्यावर आली. संभाजी महाराजांच्या हत्येनंतर विस्कटलेले स्वराज्य सावरण्याचे महान कार्य राजाराम महाराजांनी केले. निराशेच्या गर्तेत अडकलेल्या मराठा साम्राज्याला ऊर्जितावस्था देण्याचे काम त्यांनी […]

खासदार छत्रपती उदयनराजे भोसले

प्रतापगडावर श्री भवानीदेवी वारसाहक्काने चालत आलेले खासगी देवस्थान आहे. त्यांनी या मंदिराला पुर्नवैभव मिळवून दिले. श्री देवी मातेचे कुलाचार निर्विघ्नपणे पार पाडले जातात. त्यांनी श्री भवानीमातेला काही अलंकार नव्याने केलेले आहेत. परंपरेनुसार वारसाहक्काने मिळालेले वैभव सांभाळलेले आहेच, त्यात नव्याने भरही टाकली आहे. […]

1 79 80 81 82 83 392
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..