नवीन लेखन...

या सदरातील व्यक्तिचित्रे केवळ मराठी माणसाचीच नाहीत.. तर भारतातल्या आणि जगातल्याही कर्तृत्ववान माणसांची व्यक्तिचित्रे येथे नियमितपणे वाचा..

माणूस या साप्ताहिकाचे संस्थापक संपादक श्री. ग. माजगांवकर

‘माणूस’चे मुखपृष्ठ संपूर्ण काळ्या रंगाचे- त्यावर एक मोठे प्रश्नचिन्ह काढून श्रीगमांनी आपला विरोध नि:शब्दपणे, पण अत्यंत समर्थपणे व्यक्त केला. त्याबद्दल पोलिसांनी बोलावून त्यांना चांगली ‘समज’ही दिली होती. भारतात किंवा जगभरात जिथे कुठे अशांतता, असंतोष, उद्रेक, किंवा काही आशादायक घडले, की त्वरित त्याचा लेखाजोखा ‘माणूस’मधून घेतला जायचा. […]

पत्रकार, लेखक हंटर थॉम्प्सन

हंटर थॉम्प्सन हे ‘गॉन्झो जर्नालिझम’ या नवीन विक्षिप्त संकल्पनेचा जन्मदाता होत. एखाद्या बातमीच्या किंवा घटनेच्या निवेदकाने, स्वतःच त्या घटनेचा किंवा प्रसंगाचा एक भाग होऊन, मनात एकामागोमाग एक उसळून येणाऱ्या विचारांच्या आवर्तनांना दिलेलं शब्दरूप असा काहीसा हा प्रकार. समजायला काहीसा क्लिष्ट. १९५६ ते ५८ अशी दोन वर्षं अमेरिकन एअर फोर्समध्ये काढल्यावर ते पत्रकारितेकडे वळले. […]

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्पकार राम सुतार

राम सुतार यांनीच गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेल यांचा स्टॅच्यू ऑफ युनिटी हा पुतळा साकारला आहे. त्याची उंची १८२ मीटर इतकी आहे. याशिवाय मुंबईत बसविण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १३७.२ मीटर उंचीचा पुतळा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा २१२ मीटर उंचीचा पुतळाही ते साकारत आहेत. तसेच, सध्या अयोध्येतील राम मूर्ती बनविण्याचे काम राम सुतार करत आहेत. अयोध्येतील रामाची मूर्ती ही जगात सर्वाधिक उंच असणार आहे. […]

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी

गोळवलकर गुरुजी यांचा जन्म १९ फेब्रुवारी १९०६ रोजी रामटेक येथे झाला. माधव गोळवलकर उर्फ गोळवलकर गुरुजी हे भारतातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या हिंदुत्ववादी-राष्ट्रवादी संघटनेचे द्वितीय सरसंघचालक होते. १९४० ते १९७३ या काळात त्यांनी संघाचे पोषण आणि संवर्धन केले, त्याला भक्कम अखिल भारतीय आकार दिला. संघाची विचार प्रणाली त्यांनीच सूत्ररुपाने सांगितली. समाज जीवनाच्या विविध क्षेत्रात त्यांनी अनेक […]

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजीराजे

शिवाजी महाराजांचे लढावू आयुष्य, सुरुवातीचा लढा, पहिली स्वारी आणि तोरणागडावरील विजय, शहाजीराजांना अटक, जावळी प्रकरण, आदिलशहाशी संघर्ष, अफझलखानाचा वध, प्रतापगडावरची लढाई, कोल्हापूरची लढाई, सिद्धी जोहरचे आक्रमण, पावनखिंडीतील लढाई, पुरंदराचा तह, मोगल साम्राज्याशी संघर्ष, शाहिस्तेखान प्रकरण, सुरतेची पहिली लूट, मिर्झाराजे जयसिंग प्रकरणे, आग्य्राहून सुटका, सवर्त्र विजयी घोडदौड, राज्याभिषेक, दक्षिणेतील दिग्विजय असा शिवाजीराजांचा एकंदर इतिहास मन भारावून टाकणारा आहे. […]

ज्येष्ठ बल्लवाचार्य विष्णू मनोहर

मार्च २०२१ मध्ये शेफ विष्णू मनोहर यांनी पुण्यात ७ तासात ७ हजार किलो मिसळ शिजवण्याचा आणि ३ तासात ३००० सामाजिक संस्थांमार्फत ३० हजार गोरगरिब, गरजू लोकांपर्यंत ही मिसळ पोहोचवण्याचा विश्वविक्रम केला गेला आहे. […]

अभिनेत्री मुग्धा चिटणीस

मुग्धा या केवळ अभिनेत्री नव्हत्या तर त्या उत्कृष्ट कथा-कथनकारही होत्या. भारत आणि अमेरिकेत त्यांनी कथाकथन शैलीत ५०० कार्यक्रम सादर केले होते. मुंबईतील ‘ऑल इंडिया रेडिओ’मध्ये पुष्कळ कार्यक्रम सादर केले. […]

क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे

लहुजींनी महात्मा फुले यांच्या दलित घरात सर्वतोपरी सहकार्य केले. म. फुले यांनी मुलींसाठी शाळा काढली (१८४८). लहुजींनी स्वत:च्या मुक्ता या पुतणीस या शाळेत पाठविले आणि राणबा (हरिजन) च्या मदतीने अनेक मुलींना त्यांच्या शाळेत दाखल केले. मुक्ताने लहुजी आणि फुले दांपत्याच्या प्रभावातून तत्कालीन दलितांच्या दु:स्थितीचे वर्णन करणारा निबंध लिहिला. तो ज्ञानोदय नियतकालिकात प्रसिद्ध झाला (१८५५). तो पुढे ना. वि. जोशीकृत पुणे वर्णन (पुरवणी अंक २) यात छापण्यात आला. […]

ज्येष्ठ तत्वज्ञ जे कृष्णमूर्ती

कृष्णमूर्तींच्या मतानुसार दारिद्र्य, युद्धे, आण्विक संकट आणि इतर दुर्दैवी गोष्टींचे मूळ आपल्या विचारांमध्ये आहे. आपल्या विचारांप्रमाणे आपण जगतो आणि वागतो त्या प्रमाणेच युद्धे आणि सरकारे त्याच विचारांचा परिपाक आहेत. […]

‘भारतीय सशस्त्र क्रांतिचे आद्य जनक’ वासुदेव बळवंत फडके

वासुदेवांनी ब्रिटिश सत्तेला उलथून टाकण्यासाठी सशस्त्र सैन्य उभारण्याचे ठरविले. त्यासाठी त्यांनी काही सहकारी तयार केले. त्यात दौलतराव, गोपाळराव, गणपतराव घोटवडेकर, अप्पा वैद्य, अण्णासाहेब पटवर्धन, परशुराम पाटनकर, भिकाजी पंथ हर्डीकर, माधवराव नामजोशी, सितारामपंत गोडबोले, विष्णु खरे ,बाबु जोशी आदि तरुण होते. […]

1 81 82 83 84 85 392
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..