नवीन लेखन...

या सदरातील व्यक्तिचित्रे केवळ मराठी माणसाचीच नाहीत.. तर भारतातल्या आणि जगातल्याही कर्तृत्ववान माणसांची व्यक्तिचित्रे येथे नियमितपणे वाचा..

ज्येष्ठ समीक्षक शंकर सारडा

सावंतवाडी येथे १९९४ साली झालेल्या अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. शंकर सारडा हे २००१-२००३ यादरम्यान ते ‘लोकमत’ रविवार पुरवणीचे संपादक होते. […]

इंडोनेशियाचे दुसरे राष्ट्राध्यक्ष सुहार्तो

१९६५ ते ६८ या काळात कम्युनिस्टांचे सरकार सुहार्तोंनी लष्कराच्या बळावर उलथवले, तेव्हा तब्बल आठ लाख कम्युनिस्ट कार्यकर्ते वा समर्थकांना त्यांनी ठार मारले. त्यानंतरही पूर्व तिमूर, पापुआ व असेह भाग आपल्याच टाचेखाली ठेवण्यासाठी सुहार्तो यांनी लष्कराकरवी किमान तीन लाख जणांचे शिरकाण केले. […]

ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अनिल अवचट

डॉ. अनिल अवचट हे केवळ लेखक व सामाजिक कार्यकर्तेच नसून ते एक कलाकारही होते. त्यांची चित्रे, लाकडातील शिल्पे, छायाचित्रे, ओरिगामी, बासरी वादन यांतून त्यांच्या अंगभूत गुणांची ओळख पटत असे. […]

दूरदर्शनचे अतिरिक्त संचालक कमलेश्वर

दूरदर्शनच्या सरकारी काळया-पांढऱ्या पडद्यावर १९७० च्या दशकात चैतन्य फुंकले ते कमलेश्वर आणि तबस्सुम या द्वयीने.. कमलेश्वर यांनी दूरदर्शनला सामाजिक-वैचारिक परिमाण दिले, तर तबस्सुम यांनी पसत मनोरंजनाचे परिमाण. […]

भारताचे माजी राष्ट्रपती आर वेंकटरमण

गोवा-मुक्तीनंतर पोर्तुगलला भेट देणारे (४ एप्रिल १९९०) ते पहिले राष्ट्रपती होत. तसेच त्यांनी मे १९९२ मध्ये चीनला भेट दिली. भारताच्या राष्ट्रपतींची ही चीनला पहिलीच अधिकृत भेट होय. […]

न्यूझीलंडचा माजी कर्णधार डॅनियल व्हेटोरी

कसोटीत तीनशेहून अधिक विकेट आणि चार हजारहून अधिक धावा करणाऱ्या भारताचा महान अष्टपैलू कपिलदेव आणि इंग्लंडचा इयन बोथम यांच्या पंक्तीत व्हेटोरीने स्थान मिळवलेय. त्यानं ६ शतके आणि २३ अर्धशतके ठोकलीत. ३४ आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये व्हेटोरीने ३८ विकेट घेतल्यात. कर्णधार म्हणूनही डॅनियल व्हेटोरी यशस्वी ठरलाय. […]

जितेंद्र विजय भोपळे उर्फ जादूगार जितेंद्र रघुवीर

जितेंद्र विजय भोपळे उर्फ जादूगार जितेंद्र रघुवीर यांचा जन्म २७ जानेवारी १९७८ रोजी पुणे येथे झाला. रघुवीर भिकाजी भोपळे ऊर्फ जादूगार रघुवीर हे जादूगार घराण्याचे अध्वर्यू ते मूळचे चाकणजवळील आंबेठाणचे. घरच्या बेताच्या परिस्थितीमुळे रघुवीर पुण्यामध्ये आले आणि अनाथ विद्यार्थी गृहामध्ये माधुकरी मागून त्यांनी शिक्षण घेतले. एकदा रस्त्याने जात असताना राणा या राजस्थानी कलाकाराला त्यांनी जादूचे खेळ […]

मराठी अभिनेता जितेंद्र जोशी

सुरवातीला त्यामध्ये विक्रम गोखले यांचे बरोबर जितेंद्र जोशी काम करीत असे. इतके जबरदस्त नाटक होते कि त्यामध्ये नातू आणि आजोबा यांच्या संघर्षामध्ये सध्याच्या दोन पिढ्यातील अंतर इतक्या प्रभावीपणे मांडला आहे कि हे नाटक पाहताना डोळ्यात अक्षरश अश्रू येतात. […]

सुलेखनकार अच्युत पालव

पॅरिसमधील एका भव्य व्यावसायिक संकुलाची सजावटीत जगभरातील सात सुलेखनकाराच्या बरोबर अच्युत पालव यांनी संस्कृत सुभाषितांच्या माध्यमातून देवनागरी लिपीला पॅरिसमध्ये पोहोचवली आहे. […]

धर्मवीर आनंद दिघे

बाळासाहेबांचं वक्तृत्व आणि व्यक्तिमत्वाकडे आनंद दिघे आकर्षित झाले होते. बाळासाहेबांची त्यांच्यावर मोहिनी होती. त्यामुळे त्यांनी उभं आयुष्य शिवसेनेसाठी काम करायचं ठरवलं आणि सत्तरच्या दशकात शिवसेनेचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून काम सुरू केलं. त्यांच्या कामात इतकं झपाटलेपण होतं की त्यांनी लग्नसुद्धा केलं नव्हते. […]

1 89 90 91 92 93 392
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..