नवीन लेखन...

या सदरातील व्यक्तिचित्रे केवळ मराठी माणसाचीच नाहीत.. तर भारतातल्या आणि जगातल्याही कर्तृत्ववान माणसांची व्यक्तिचित्रे येथे नियमितपणे वाचा..

क्रिकेटपटू वसंत रायजी

भारतातील सर्वात वयस्कर क्रिकेटपटू वसंत रायजी यांचा जन्म २६ जानेवारी १९२० रोजी झाला. रायजी यांनी १९४० च्या दशतकात ९ प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये २७७ धावा केल्या होत्या. त्यात ६८ ही त्यांची सर्वोत्तम खेळी होती. त्यांनी मुंबई आणि बडोदा संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. आयुष्याच्या खेळपट्टीवर नाबाद शतक नावावर लावणारे ते केवळ दुसरेच भारतीय क्रिकेटपटू आहेत. त्यांच्याआधी डी.बी. देवधर […]

भारतीय महिला क्रिकेटपटू डायना एडल्जी

महिला क्रिकेटपटुंमध्ये सर्वाधिक चेंडू (५०९८) टाकण्याचा विश्वविक्रम त्यांच्या नावावर आहे. आज जगभर महिलांचे क्रिकेट सामने होत आहेत. क्रिकेट सामन्यांचे प्रमाणही खूप वाढले आहे पण डायना यांचा सर्वाधिक ओव्हर टाकण्याचा विक्रम अबाधित आहे. […]

साहित्यीक विनायक गजानन उर्फ वि. ग. कानिटकर

कानिटकर यांनी ‘नाझी भस्मासुराचा उदयास्त’, विन्स्टन चर्चिल, अब्राहम लिंकन, व्हिएतनाम युद्ध, चीन.. या विषयांवरील ग्रंथांचे लेखन केले आणि त्यांचे हे सर्व लेखन मराठी वाचकांनी उचलून धरले. […]

अभिनेते कल्याणकुमार गांगुली ऊर्फ अनुपकुमार

अनूप कुमार यांनी १९५० साली आलेल्या ‘गौना’ चित्रपटात अभिनेता म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यांचे मोठे भाऊ अशोक कुमार आणि धाकटा भाऊ किशोर कुमार होत. […]

ब्रिटीश लेखिका व्हर्जिनिया वूल्फ

ब्रिटीश लेखिका व्हर्जिनिया वूल्फ यांचा जन्म २५ जानेवारी १८८२ रोजी झाला. अतिशय बुद्धिमान, तितक्याच संवेदनशील आणि शब्दांवर जबरदस्त पकड असणाऱ्या व्हर्जिनिया वूल्फ यांचा जन्म ब्रिटनमधल्या एका सधन कुटुंबात झाला. आयुष्यभर लेखन, वाचन हा एकच ध्यास घेऊन जन्मलेल्या व्हर्जिनिया यांनी केवळ वयाच्या नवव्या वर्षी व्हर्जिनिया यांनी आपल्या भावाच्या मदतीनं ‘२२ हाइडपार्क गेट’ नावाचं कौटुंबिक साप्ताहिक काढलं होते. […]

दीक्षित डाएट प्लॅनचे रचेते डॉ. जगन्नाथ दीक्षित

डॉ. दीक्षित यांनी विकसित केलेल्या उपचार पद्धतीने फक्त भारतातीलच नव्हे, तर परदेशातील रुग्णांनाही फायदा झाला आहे. सोशल मीडियावरही डॉक्टरांनी सांगितलेल्या स्वास्थ्यशैलीचा प्रचार होत असून ‘दीक्षित डाएट प्लॅन’ नावाने ती प्रसिद्ध झाली आहे. […]

ग्वाल्हेर राजघराण्याच्या राजमाता विजयाराजे शिंदे

विजयाराजे शिंदे आधी कॉंग्रेसमध्ये होत्या, पण इंदिरा गांधी यांनी राजघराणे नष्ट करण्यासाठी पाऊले उचलल्याने त्या नाराज झाल्या. १९६७ मध्ये कॉंग्रेसचा त्याग करून त्यांनी त्या वेळच्या जनसंघात प्रवेश केला. भारतीय जनता पक्षाच्या संस्थापकांपैकी त्या एक होत्या. मध्य प्रदेशच्या राजकारणात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. […]

कोलगेटचा निर्माता विल्यम कोलगेट

लहानपणापासून अनेक पिढय़ांनी पांढरा आणि लाल अशा टिनमधील टुथपेस्ट पावडर ते त्याच रंगाच्या टय़ूबमधील टुथपेस्ट असा प्रवास अनुभवलेला असतो. खूप सारे पर्याय उपलब्ध नसताना टुथपेस्ट म्हणजे कोलगेट हे गणित डोक्यात पक्कं होतं. […]

दाते पंचांग कर्ते लक्ष्मणशास्त्री दाते उर्फ नानाशास्त्री दाते

१०३ वर्षापूर्वी पंचांगकार्याची मुहूर्तमेढ नानाशास्त्री दाते यांनी रोवली. पंचांग बनवताना पंचांगाचे गणित सोडवताना नानाशास्त्री दाते यांची मान आणि कंबर दुखत असे; मग त्यांनी भिंतीवर गणित सोडवायला सुरुवात केली. भिंतीचा कागद केला. नानांचे सुपुत्र धुंडीराजशास्त्री दाते यांनी या कामात लक्ष घालायला सुरुवात केली तेव्हा आधुनिकतेचं पाऊल टाकलं. […]

1 90 91 92 93 94 392
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..