बीबीसीने २००२ मध्ये घेतलेल्या ‘१०० सर्वश्रेष्ठ ब्रिटन्स’ या जनमत चाचणीत चर्चिल यांनाच पहिल्या क्रमांकाची मते मिळाले. सर्वेक्षणानुसार चर्चिल यांनी साहित्यिक शेक्सपीअर, समाजशास्त्रज्ज्ञ चार्ल्स डार्विन आणि अभियंते ब्रुनेल यांना मागे टाकलं होते. […]
अन्य प्रसार माध्यमांमधून चित्रपट व कलाकारांविषयी सातत्याने लेखन करणाऱ्या अशोक शेवडे यांची पाच हजार मुलाखतींचा बादशहा अशी ख्याती होती. देशभरातील नामवंत साहित्यिक, तसेच चित्रपट दिग्दर्शक, लेखक, कवी यांसह शिक्षक यांच्यासह सांस्कृतिक क्षेत्रातील दिगगजांच्या मुलाखती शेवडे यांनी घेतल्या होत्या. […]
विष्णुदास भाव्यांनी बनवलेल्या त्या बाहुल्या पुढे रामदास पाध्येच्या हातात आल्या. रामदास पाध्ये व अपर्णा पाध्ये यांनी खूप दिवस खटपट करून विष्णुदास भावे यांच्या बाहुल्यांच्या रहस्याचा छडा लावला, आणि एके दिवशी, विष्णुदास भावे यांना रंगमंचावर करता न आलेला सीता स्वयंवराचा प्रयोग त्याच बाहुल्या वापरून केला. […]
त्यांच्या त्या काळी वारंवार होणाऱ्या विमान प्रवासांमुळे, त्यांना पु.ल.देशपांडे यांनी गमतीने ‘हवाईगंधर्व’ ही पदवी बहाल केली होती. भीमसेन जोशी यांनी, त्यांचे गुरू सवाई गंधर्व यांच्या स्मरणार्थ १९५२ सालापासून पुणे येथे दरवर्षी होणारा सवाई गंधर्व संगीत महोत्सव सुरू केला. […]
त्यांना महात्मा गांधी व आचार्य विनोबा भावे यांचा सहवास लाभला. ते देशभक्त होते. त्यांनी इंग्रजांविरुद्ध संघर्ष केला. कोणताही व्यवसाय सुरू करताना ते सर्वात आधी देशाचा विचार करीत होते. […]
मोरेश्वर वासुदेव उर्फ बंडोपंत सोलापूरकर यांचा जन्म १८ एप्रिल १९३३ रोजी झाला. बँड संस्कृती रुजवण्यात महत्त्वाची भूमिका असलेलं अनुभवी व्यक्तिमत्त्व म्हणून बंडोपंत सोलापूरकर यांची ख्याती होती. त्यांनी बँडची संस्कृती नुसती रुजवलीच नाही, तर तिला प्रतिष्ठा मिळवून दिली. त्याचे महत्त्व अधोरेखित केले. वयाच्या सातव्या वर्षांपासून त्यांनी त्यांचे मोठे बंधू अण्णासाहेब सोलापूरकर यांच्याकडे क्लॅरोनेट वादनाचे प्राथमिक आणि पंडित […]
पदरमोड करून त्यांनी अनेक गरीब आणि गरजू मुलांना कलाशिक्षण दिले. ज्या तुळशीबागेमध्ये बालपणापासून वास्तव्य होते त्या गणरायाची मूर्ती खटावकर यांच्या कसबी हातांनीच घडली आहे. […]
त्यांनी १९८० मध्ये मोहम्मद रफी यांच्यासोबत तूने मुझे बुलाया शेरा वालिए, १९८३ मध्ये आशा भोसले यांच्यासह चलो बुलावा आया है माता ने बुलाया है, दो घूंट पिला के साकिया, हुए हैं कुछ ऐसे वो हमने पराए यासारखी अजराअमर गाणी गायली आहेत. यानंतर त्यांनी आपल्या भजनांनी बरंच नाव कमावलं. […]
वयाच्या दहाव्या वर्षी शिलेदारांच्या ‘त्रिपात्री’ ‘सौभद्र’ पासून कीर्ती शिलेदारांचे संगीत रंगभूमीवर पदार्पण झाले. ‘संगीत सौभद्र’ या नाटकातील नारदाची भूमिका त्यांनी प्रथमच केली आणि रसिक प्रेक्षकांची मने जिंकली. संगीत आणि अभिनय याचे धडे घेत असतानाच आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मराठी या विषयातील ‘बी.ए. ‘ची पदवीही कीर्ती शिलेदार यांनी मिळविली. […]
विजय कुवळेकर यांनी ‘सातच्या आत घरात’सारख्या काही चित्रपटांचं लेखन केलं आहे. तसेच ‘सरकारनामा’ या चित्रपटासाठी त्यांनी गीतलेखन केलं होतं. तसंच, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या एका मालिकेत त्यांनी सावरकरांची भूमिकाही केली होती. […]