जन्म.२९ ऑक्टोबर १९६६ साठच्या दशकात सुनील मेहता यांचे वडील अनिल मेहता यांनी मेहता पब्लिशिंग हाऊसची स्थापन केली. १९७६ साली वडील अनिल मेहता यांनी पुण्यात स्थापन केलेल्या ‘मेहता पब्लिशिंग हाऊस’ या प्रकाशन संस्थेची सगळी सूत्रे १९८६ साली सुनील मेहता यांच्याकडे आली. पारंपारिक प्रकाशन व्यवसायाचे डिजिटायजेशन करण्याचे श्रेय हे सुनील मेहतांना जाते. हिंदी, बंगाली, कन्नड, गुजराती आणि इंग्रजी […]
सयाजी शिंदे यांना खऱ्या अर्थे नाव आणि ओळख मिळाली ती रामगोपाल वर्मा याच्या “शूल’ या चित्रपटातील बच्चू यादवच्या भूमिकेमुळे. बिहारमधील हे पात्र सयाजी शिंदे यांनी इतक्या चांगल्यारीतीने वठवले, की देशभर त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. […]
अगाथा ख्रिस्तीच्या कथा-कादंबऱ्यांतील रहस्याची उकल जशी शेवटपर्यंत होत नसे, तसेच त्यांच्यातील खुनाचे तपशील विलक्षण जिवंत, वास्तवाधिष्ठित असत. हाणामारी वा पिस्तुलबाजी टाळून, तिच्या कादंबऱ्यांतील अनेक मृत्यू विषप्रयोगाने होत. १९६१ मध्ये प्रसिद्ध झालेल्या तिच्या ‘पेल हॉर्स’मध्ये खून ‘थेलियम’ या विषाद्वारे झाल्याचे दाखविण्यात आले होते. […]
मामा पेंडसे यांचा जन्म २८ ऑगस्ट १९०६ रोजी सांगली येथे झाला. मामा पेंडसे हे गाजलेले नट होते. ‘पंडितराज जगन्नाथ’,‘वहिनी’,‘दुरितांचे तिमिर जावो’ या नाटकातील त्यांच्या भूमिका गाजल्या होत्या. मामा पेंडसे यांचे वडील सांगली संस्थानात नोकरी करीत होते. वडील निवृत्त झाल्यावर घरची परिस्थिती बिकट झाली. सांगलीच्या सिटी हायस्कूलमधून मामांनी कसबसे शिक्षण घेतले. मामांचा दुधाचा व्यवसाय होता. केवळ नाटकातून […]
कुठल्याही प्रकारांतलं गाणं असो, शास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत, भक्तिसंगीत, भावगीत, गजल, कव्वाली किंवा एखादं पाश्चिमात्य गाणे प्रत्येक प्रकार संपूर्ण ताकदीने, तो ऊर्जेने परिपूर्ण असतो. […]
सायन येथील एका स्टुडिओत काम करताकरताच तेव्हाच्या प्रसिद्ध अभिनेत्री हंसा वाडकर यांच्या नजरेतून कुमुद यांचे तेज सुटले नाही. त्यांनी राजा परांजपे यांना सांगून ‘लाखाची गोष्ट’ या चित्रपटात कुमुद यांना नायिकेच्या भूमिकेत घेतले. हाच रेखा यांचा पहिला चित्रपट. चित्रादेखील त्यांच्या सहनायिका होत्या. ‘लाखाची गोष्ट’ची कथा, पटकथा ग.रा. कामत यांची होती. […]
विकासाची दृष्टी असणारे आणि त्यासाठी अथक वेळ देणारे शिस्तीचे नेते म्हणून त्यांनी ओळख आहे. सर्वाचेच ऐकायचे हा त्यांचा स्वभाव असला तरी कुणाचे आणि कोणते काम करायचे याबाबत मात्र ते कमालीचे जागरूक असल्याचे मानले जाते. […]
१९६४ रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेतलेल्या शास्त्रींनी अल्पावधीतच भारतीय राजकारणावर आपला ठसा उमटविला. १९६५ च्या पाकशी झालेल्या युद्धात देशास खंबीर नेतृत्व दिले आणि देशाची प्रतिमा उजळून टाकली. ‘जय जवान, जय किसान’ या त्यांच्या मंत्राने अवघा देश भारावून गेला. […]
बालमजुरी आणि लहान मुलांची वाहतूक रोखण्याचे उद्दिष्ट ठेवून; तसेच सर्व मुलांना शिक्षण हे ध्येय ठेवून ‘बचपन बचाव संस्थे’ची स्थापना त्यांनी केली. या संस्थेच्या माध्यमातून अनेक बालकामगारांची सुटका करण्यात आली. त्यामध्ये प्रामुख्याने रग उत्पादक कंपन्यांमधील बालमजुरांचा समावेश आहे. […]