नवीन लेखन...

या सदरातील व्यक्तिचित्रे केवळ मराठी माणसाचीच नाहीत.. तर भारतातल्या आणि जगातल्याही कर्तृत्ववान माणसांची व्यक्तिचित्रे येथे नियमितपणे वाचा..

शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार

नगरपरिषदेच्या वीस वर्षाच्या सत्ता कार्यकाळात अडीच-तीन वर्षे सोडता पूर्ण कार्यकाळ अब्दुल सत्तार दांपत्यांनी नगराध्यक्ष म्हणून भूषविले आहे व आजही सत्ता त्यांच्याकडे असून नगराध्यक्षपदी त्यांच्या पत्नी नफिसाबेगम अब्दुल सत्तार असून नगरपरिषदेच्या एकूण एकोणतीस सदस्यांपैकी अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वाखाली पंचवीस नगरसेवक सभागृहात आहेत. […]

अभिनेता सागर कारंडे

सागर सादर करत असलेले ‘चला हवा येऊ द्या’ मधील पोस्टमन काका हे प्रेक्षकांच्या मनातील हळवा कोपरा आहेत. हे पोस्टमन काका प्रेक्षकांच्या अश्रूंना वाट मोकळी करून देतात. हीच खऱ्या अर्थानं सागरमधील अभिनेत्याला मिळालेली दाद आहे… […]

शिवसेना उपनेते, खासदार अरविंद सावंत

शिवसेना पक्षाच्या स्थापनेपासुनच अरविंद सावंत आघाडीचे शिलेदार आहेत. शिवसेना पक्ष बांधणीमध्ये त्यांनी मोलाची कामगिरी केली. वक्तृत्व, मुत्सद्देगिरी व समाजकारण यांचा त्रिवेणी संगम म्हणजे अरविंद सावंत. अरविंद सावंत यांची शिवसेनेतील ५० हून अधिक वर्षांची राजकीय कारकीर्द राहिली आहे. […]

प्रख्यात मल्ल गजानन यशवंत माणिक (ताम्हणे) ऊर्फ माणिकराव

अवघ्या एकोणिसाव्या वर्षी तीन हजार दंड, पाच हजार बैठका आणि सात तास कुस्तीचा सराव करणा-या माणिकरावांचे अस्थिसंस्था, युनानी वैद्यक व शस्त्रास्त्रविद्येवरही प्रभुत्व होते. […]

माजी केंद्रीय आरोग्य मंत्री राजनारायण

आणीबाणीनंतर १९७७ साली झालेल्या निवडणुकीत राजनारायण यांनी इंदिरा गांधींचा त्यांचा बालेकिल्ला असलेल्या “रायबरेली” मतदारसंघात मोठा पराभव केला. जनता पक्षाकडून निवडणुक लढवणाऱ्या राजनारायण यांनी इंदिरा गांधींचा रुपात भारतातील सर्वात शक्तिशाली महिलेचा पराभव केला होता. […]

ज्येष्ठ कवि मंगेश पाडगावकर

स्वतः प्रेमळ व्यक्ती, प्रेमळ प्राध्यापक असल्यानं प्रेमकवितेवर त्यांचं विशेष प्रेम होतं. पण, भावगीतं, बालकविता, निसर्गकविता, चिंतनशील कविताही त्यांनी तितक्याच प्रभावीपणे केल्या होत्या. त्या सादर करण्याची त्यांची पद्धत तर अफलातून होती. […]

‘हॉटमेल’चे सबीर भाटिया

पहिल्याच वर्षी हॉटमेलने सगळ्यात प्रसिद्ध असलेल्या अमेरिकन ऑनलाईन (AOL) या ई-मेल कंपनीलाही मागं टाकलं. अमेरिका ऑनलाइनला सहा वर्षांत जेवढे ग्राहक मिळाले त्यापेक्षाही जास्त ग्राहक हॉटमेलला दोन वर्षांत मिळाले! […]

दिग्दर्शक दत्ता धर्माधिकारी

शांता आपटे हिचा त्यावेळी इतका प्रचंड दबदबा होता की तिच्यासमोर दत्ताजी जेव्हा उभे राहिले तेव्हा त्यांना दरदरून घाम फुटला व त्यांनी कॅमेऱ्या्समोरून एकदम पळ काढला. ते काम मग संकलन विभागात काम करणाऱ्या अनंत माने यांनी केलं. […]

फिलिपिन्सचे तिसरे राष्ट्राध्यक्ष रेमन मॅगसेसे

१९५३ पर्यंत मॅगसेसे यांनी राबवलेली ‘अँटी गोरीला’ मोहीम ही आधुनिक इतिहासातल्या सर्वांत यशस्वी मोहिमांपैकी एक मानली जाते. सर्वसामान्यांचा पाठिंबा नसेल तर हुक चळवळ टिकणार नाही हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर लष्कराने सामान्यांना सन्मानाने वागवावं असं सांगतं तसंच गरीब शेतकऱ्यांना जमीन आणि अवजारं देऊ करत, त्यांना सरकारच्या बाजूला वळवून घेतलं. […]

1 97 98 99 100 101 392
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..