सेसिल डमिल यांचा जन्म १२ ऑगस्ट १८८१ रोजी मॅसाच्युसेट्स येथे झाला .
सेसिल डमिल हा अमेरिकन सिनेमाचा आद्य महापुरुष मानला जातो! स्वतः अभिनेता आणि दिग्दर्शक असणाऱ्या डमिलने मूकपटांपासून बोलपटांपर्यंत ७०हून अधिक सिनेमे बनवले. भव्यदिव्य सिनेमे बनवण्याबद्दल तो प्रसिद्ध होता. त्याचे ‘क्लिओपाट्रा’,‘सॅमसन अँड डलायला’, ‘दी टेन कमांडमेंट्स’ हे सिनेमे त्यांतल्या भव्यतेमुळे लोकांच्या मनांत आजही घर करून आहेत.
जेस लास्की आणि सॅम्युअल गोल्डविन यांना बरोबर घेऊन त्याने पॅरामाउंट पिक्चर्स ही कंपनी काढली. मेल अँड फीमेल, डायनामाइट, दी बकॅनिअर, नॉर्थवेस्ट माउंटेड पुलिस, दी किंग ऑफ किंग्ज, दी ग्रेटेस्ट शो ऑन अर्थ – असे त्याचे सिनेमे प्रसिद्ध आहेत.
२१ जानेवारी १९५९ रोजी सेसिल डमिलचे निधन झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply