
२४ फेब्रुवारी १९४४ रोजी केंद्रीय उत्पादन शुल्क व नमक कायदा लागू केल्यामुळे सेंट्रल एक्साइज (केंद्रीय कस्टम आणि उत्पादन शुल्क) (Central Board of Excise and Custom – CBEC) दिवस २४ फेब्रुवारीला साजरा केला जातो.
केंद्रीय कस्टम आणि उत्पादन शुल्क बोर्ड केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या महसूल विभागाच्या अंतर्गत येते आणि हा एक प्रकारचा अप्रत्यक्ष कर आहे. यांच्या खाली केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमाशुल्क, देशातील सीमाशुल्क, जीएसटी, केंद्रीय उत्पादन शुल्क, सेवा कर आणि नारकोटिक्सची जबाबदारी आहे.
उत्पादन शुल्क विभागाची सुरुवात १८५५ मध्ये ब्रिटीशांनी केली. देशातील लोकांना या संस्थेबद्दल माहिती देण्यासाठी केंद्रीय कस्टम आणि उत्पादन शुल्क दिन साजरा केला जातो.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply