(सद्गुरू कबीर साहेबांच्या भक्ती साहित्यात राम शब्दाचा उल्लेख बऱ्याचदा आलेला आहे. त्यांच्या अनुसार राम शब्दाचा अर्थ दशरथ पुत्राशी संबंधित नाही तर परब्रह्माशी आहे. ते चार रामांचे यथार्थ वर्णन करून चवथा राम ज्याला ते नाम निःअक्षर रूप मानतात त्यांच्या भक्तीचा मुक्तीसाठी आग्रह करतात.)
निः अक्षर निज पावई, मिटी है सकल अंदेश।
निः अक्षर जाने बिना, घर ही में परदेस ।।
कबीर साहेबांच्या मताप्रमाणे चार राम खालीलप्रमाणे आहेत..
पहिले, सर्वसामान्य जन दशरथपुत्र रामाला देव समजून भक्ती करतात तो राम… दुसरे, सर्वांच्या हृदयात आत्मरूपाने विराजमान आहे तो राम. … तिसरे आपल्या शरीरात असलेल्या तीन लोकांचा नियंत्रक जो ज्योती स्वरूप निरंजन राया रूपी राम. चौथे, उपरोक्त वर्णीत तीनही रामापेक्षा वेगळा आणि जो संपूर्ण ब्रह्मांडा निर्माता असून या सर्वांवर नियंत्रण करणारा आहे आणि जो कधीही जन्माला येत नाही किंवा मरतही नाही. तसेच जो अपरिवर्तनीय आहे तो नाम निःअक्षररूपी राम होय. असा ‘राम’ ह्या नाम निःअक्षर रूपी रामाच्या भक्तीचा आग्रह मुक्तीसाठी करावा असा संदेश कबीर साहेबांनी दिलेला आहे. त्यामुळे नाम निःअक्षराची भक्ती केल्याशिवाय कोणताही साधक भवसागरात तुरून जाऊ शकत नाही. त्यामुळे त्याची मुक्तीदेखील होऊ शकत नाही हे साधकांनी लक्षात घ्यावे. कबीर साहेब म्हणतात,
चार राम है जगत में –
एक राम है दशरथ का प्यारा।
एक राम है घट घट न्यारा ।
एक राम का सकल पसारा ।
एक राम है सबही ते न्यारा ।।
ताका करो विचारा-
कबीर साहेबांनी भक्तीसाठी ज्या चार रामाचे मार्गदर्शन केले ते सर्व आध्यात्मिक मार्गावर चालणाऱ्या साधकासाठी पथदर्शकाचे काम करणार आहेत. राम शब्दाला प्रतीकरूप मानून त्यांनी भक्ती करणाऱ्या सर्व साधकांना स्पष्ट इशारा (चेतावणी) दिला आहे की तुम्ही कोणत्या रामाची भक्ती करण्यात मग्न झाले आहात. तुम्हाला ” पोहचावयाचे आहे? तुम्ही ज्याची भक्ती करीत आहात त्याला तुम्ही मिळवू शकता काय? जर त्याला आपण भक्ती करून भेटू शकत नाही तर आपल्या भक्ती करण्याची दिशा आपणास बदलवावी लागेल, सतनाम काय आहे? कसे आहे? हे आधी समजून घ्यावे आणि नंतरच त्याचा स्वीकार करण्याचा सल्ला कबीर साहेबांनी दिला आहे.
-संत कबीर
Leave a Reply