लवंग, आले दालचिनीचा
सुगंध सारा भरून घ्यावा
डोळे मिटूनि निवांत रेलून
घोट चहाचा हळूच घ्यावा
वेळ असो दुपार तीनाची
की पहाटेचा असो गारवा
चहास का लागे निमित्त कोणते?
कधीही द्यावा कधीही घ्यावा
चाहते असे चहाचे मिळता
योग दुर्मिळ जुळून यावा
स्थळकाळाचे बंधन सोडून
मस्त गप्पांचा फड रंगावा
मात्र एकट्या सांजवेळी
घोट चहाचा हळूच घ्यावा
पापणीतल्या सुखस्वप्नांना
आठवणींचा गहिवर यावा…
—आनंद
Leave a Reply