तो क्षण फार मस्त असतो
जेंव्हा चहा उकळत असतो
सुगंध सार्या घरभर पसरतो
किचनमधून कपबशांचा आवाज येतो
अमृतरुपी चहाला कधी स्वाद आल्याचा
गवतीचहा कधी, तर कधी सुगंध वेलचीचा
तुलसीचहा मसालाचहा – रंग नाना रुपांचा
उत्तेजित करे,क्षमता वाढवे-आनंद देई जीवनाचा
मग चहा संगे बिस्कीटे येती
कुणी पोहे त्यात बुडवून खाती
तर कुणी गरमागरम भुरके मारुन पिती
बशीत ओतून पिणारे पण असती
मित्रांची मैफिल चहाविना नाही
पाहुण्यांचे स्वागत त्याच्याशिवाय नाही
आस्वाद घ्यावा कधीही,वेळेचे बंधन नाही
दुःख असो,आनंद असो,चहासारखी साथ नाही
श्री सुनील देसाई
२२/०५/२०२२
Leave a Reply