किती किती घाई आम्हां असते पहा
ऊर फुटेस्तोवर सारे धावतो पहा
दिस आजचा जरा जगून ही घ्या
येत नाही आजचा क्षण रे उद्या
किती सारे राहिलेले पाहूनही घ्या
किती सारे उरलेले लिहूनही घ्या
वेळ कधी कुणासाठी फिरे ना पुन्हा
वयही जे जाई पुढे मागे सरेना
किती चवीने जिभेचे चोचले केले
काही आहे खायचे, काही राहून गेले
आज आता वेळ आहे तृप्त होऊनिया
देऊ थोडे भुकेलेल्या दान करूया
जुने सारे हिशेब चला माफ करूया
गाठी बांधल्या ज्या थोड्या सैल करूया
आतड्या कशाला उगा पीळ घालूया
मुक्त मित्रत्वाने साऱ्यांना या बांधूया
आजचा दिस खरा आहे जगण्याचा या
उद्या कोणी पाहिले, आहे किंवा जा
कष्ट आणि सत्य सार जीवनी जगा
जगू समाधानाने आनंद पेरूया चला!!
— वर्षा कदम.
Leave a Reply