चालला घेऊन तो, श्रीरामाला वनवासाला,
नौकानयन करत करत,
पाण्यातील प्रवासाला,
नौका चालवे नावाडी,
नदी तरुन जाण्या,
श्रीरामासंगे जानकी,
लक्ष्मण रक्षण करण्या,
त्रिकूट’ चालले जलप्रवासा,
जसे ओलांडती भवंसागरा,–!!!
नावाडीच श्रीराम ते,
संसार सागरातून तारण्या,–!!
प्रवासीच इथे खरा नावाडी,
अन् नावाडी असे प्रवासी,
संसार सागर उफाळतां,
नावाड्याचे कसब पणाशी,–!!
हिमगौरी कर्वे.©
Leave a Reply