चालणे सुरु तर कर ….पोहोचणार नाही कशावरुन ?
बोलणे सुरु तर कर …टाळ्या पडणार नाही कशावरुन ?
टिम्ब काढ रेषा होतील…रेषारेषांचे चित्र जाईलच बनून
आवड तयार होईल …कलाकृती छान घडणार नाही कशावरुन ?
लिहिणे सुरु तर कर.. कविता होईल ओळी मिळून
जमणार नक्की …लाईक मिळणार नाही कशावरुन ?
हे जमत नाही ते जमत नाही…सोड सांगणं( गाऱ्हाणं) फिरून फिरून
गाणं सुरु तर कर …सूर सापडणार नाही कशावरुन ?
घाबरतो उगाच आपण…रुपडं बघून वरुन वरुन
अंतरंगात बघ गुण शोधून …जगणं जमणार नाही कशावरून ?
# कौशल
— श्रीकांत पेटकर
Leave a Reply