नवीन लेखन...

चमचेगिरी

चमचा आणि चमचेगिरी कधी पासून सुरू आहे माहीत नाही पण. चमच्याचे जातभाई यांची ओळख सगळ्यांना आहे. आता ते कोण कोण आहेत ते पाहून सांगा की आहे ना ओळख?

पळी.. ही अगदी छोटी जिला देवपूजा करताना वापरतो. त्यात थोडेसेच पाणी मावते. आणि त्यातून किती गोष्टी साध्य होतात पहा. आचमन घेताना वाया जात नाही. तोंड पवित्र होते. ताटाभोवती पाणी फिरवून सूक्ष्म जंतू थोपवले जातात. उपयुक्त वस्तू..

पळीच आहे पण रुप मोठे. भांड्याला चिमट्याने घट्ट पकडून ठेवले की पळीचे काम सुरू होते. डाळीला घोटून घोटून त्याचा कडकपणा एकदम मवू केला की आमटीला योग्य. आणि कधी कधी तिला गोलाकार फिरुन सगळीकडे लक्ष द्यावे लागते. नाहीतर फसफस करीत उतू जातात. म्हणून खडा पहारा ठेवावा लागतो. बिचारी पळी दमून जाते हो. फिरुन फिरुन…

डाव… खर तर कोणता डाव मनात असतो कळत नाही. पण चमचेगिरी करताना डाव याचा खूप उपयोग होतो म्हणून चमच्याचा साथीदार आहे. शेवटपर्यंत कळत नाही की डाव ही काय चीज आहे ते. म्हणून सावध असावे हे कधीही चांगलेच…

चाटू…. हे असते लाकडाचे म्हणून त्याची किंमत कमी होत नाही. मात्र त्याला रोज स्वयंपाक घरात येता येत नाही. एक दिवस त्याचाही येतो. त्यामुळे ते किती महत्वाचे आहे याची किंमत कळते. चिक. लापशी. वाळवणाचा कोणताही पदार्थ शिजवताना काही ही असो. तिथे आतल्या गाठीचे मुळीच चालत नाही. आतल्या गाठीने खूप मोठे नुकसान होते. केलेल्या मेहनतीवर पाणी फेरले जाते. यासाठी चाटू किती मोठे काम करतो याची जाणीव ठेवावी. तो अशा आतल्या गाठींना कोंडीत पकडून सगळीकडून असा हिसका दाखवतो की ते एकदम सुतासारखे सरळ होतात. सगळ्यात मिसळून राहतात. खर तर हे खूप अवघड असतं.यज्ञात होमात तेल टाकणारी छोटी लाकडी पळी पण आगीत तेल ओतणारी. तीही असतेच..
चमचेगिरीतील मूळ मुद्दा बाजूला राहिला हे लक्षात आले म्हणून चमचा. जो खाताना मचमचा करू नये हे शिकवतो.थोडे थोडे करून पदार्थांचा आस्वाद घ्यावा हे सांगतो. पळी. डाव अनुपस्थित राहिले तर लगेचच पुढे होऊन त्यांचे काम करतात. याचेही प्रकार आहेत. खोलगट. सपाट. चहा साखरेचे. तिखट मीठ यांचे. लोणची मुरंबा काढण्यासाठी लाकडी. आणि ज्याची आवड खूपच आहे म्हणून ते गपागपा खाल्ले की दाताला इजा होऊ नये म्हणून अगदी छोटेसे रुप असलेले. आईस्क्रीमचे चमचे…

इतके बहुरुपी. बहुरंगी. बहूकामी असलेला हा चमचा बदनाम का झाला हे कळत नाही. चमचेगिरी म्हणजे काय हे सर्वच जाणतात.चमचा पाश्चात्य देशात सभ्यता समजला जातो. चमचे आणि त्याचा गोतावळा हे घरात किंवा समाजात कोण कसे काय करतात हे तुम्ही सगळे आपापल्या परीने अंदाज व्यक्त करु शकता. एक उदाहरण देते. देवपुजेची पळी. पावसाचा एक थेंब. थोडे वापरा. जीवदान द्या. जिरवा. अडवा. स्वच्छता राखा. थेंबे थेंबे तळे साचे ही शिकवण देते. अजून काही सुचत असेल तर सांगा.

–सौ. कुमुद ढवळेकर.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..