काही महिन्यांत सण व उत्सवांना सुर्वात होईल आणि सर्व वातावरण आनंदी उत्साही व सुगंधाने भरून जाईल पण या आनंदी व उत्साही वातावरणात आपल्या सर्वांवर पर्यावरण रक्षणाची जबाबदारी आहे हे विसरून चालणार नाही. सध्या पर्यावरण रक्षणासाठी सर्वत्र इकोफ्रेन्डलीचा प्रचार आणि प्रसार होत आहे व त्याला प्रतिसादही उत्तम मिळतो आहे. दर वर्षी शासन व महापालिका सण व उत्सव सूरू होण्याआधी विविध जनसंपर्काच्या माध्यमांतून सर्व भक्तांना उत्सवातील मूर्तींचे विसर्जन समुद्र नद्या तळी व विहीरींमध्ये करतांना काही खबरदारी घेण्याची विनंती/आवाहान करतात की जेणे करून कमीत कमी जलप्रदुषण होईल. सगळेच ही बातमी वाचतात ऐकतात आणि नेहमीच्या सवयी प्रमाणे विसरूनही जातात पण कृती फारच थोडयांच्या हातून होताना दिसते.
रोजच्या उपयोगातील तसेच सण व उत्सवासाठी लागणार्या वस्तु बाजारात स्वस्त व दिसायला चांगल्या दिसल्या की आम्ही त्या विकत घेतल्याच म्हणून समजा. त्या वस्तुचा ब्रॅन्ड व गॅरेन्टी काय आहे खराब झाल्यास बदलून किंवा नवीन मिळतील का याचा विचार नकरता वस्तु विकत घेतो व नंतर पस्तावतो. स्वस्त व मस्तचा अभ्यास चीनदेशाने केल्याने आज भारतीय बाजारपेठात त्यांच्या वस्तु सहज विकल्या जातात.
चीन देशातील श्री गणेश मुर्ती गेल्या दोन तीन वर्षे भारतीय बाजारपेठांत दिसते आहे. काही दिवसांत अशा मुर्ती भारतीय बाजारात विषेशतः मुंबईत येतील. आपण त्या खरेदी करायच्या का नाही ते प्रत्येकाने ठरवायचे आहे. वाचनात आले आहे की सर्व मुर्ती पीओपी व फायबर ग्लास पासून बनविल्यात जातात.
चीनी गणेशांच्या मुर्ती स्वस्त व मस्त असतील पण असे समजते की श्री गणेशाची मुर्ती बनविणार्या कलाकारांना श्रीगणेशाची सोंड कुठे वळवावी हे अजून निटसे समजलेले दिसत नाही. याचा अर्थ धोपट मार्गाचा अवल
ब केला आहे. मुख्य म्हणजे मुर्ती बनविण्यासाठी वापरलेल्या वस्तु इकोफ्रेंन्डली आहेत कया?
ब केला आहे. मुख्य म्हणजे मुर्ती बनविण्यासाठी वापरलेल्या वस्तु इकोफ्रेंन्डली आहेत कया?
मुर्ती रंगविण्यासाठी वापरलेला रंग इकोफ्रेन्डली
आहे का? आपल्या समुद्र नद्या तळी विहीरीत मुर्तींच्या विसर्जनाने पाण्याचे प्रदषण तर होणार नाही ना? विदेशी वस्तुंच्या व मालाच्या खरीदीव्यवहाराने आपल्या देशातील उद्योगधंद्याचा व गोरगरीब मजुरांच्या पोटापाण्याचा प्रश्न गंभीर होईल याकडेही आपल्यासारख्या दक्ष नागरीकांनी लक्ष दिले पाहिजे. असो.
मला तरी असे वाटते की भारतातील प्रत्येक सच्च्या गणेशभक्ताने आपल्या देशातील कारागीरांनी बनविलेल्या इकोफ्रेन्डली गणेशमुर्ती घराघरात बसवून आपल्या सोहळयाची शान वाढवावी व इतरांसमोर आपला आदर्श ठेवावा. जलप्रदुषण कमीत कमी होण्यासाठी सर्वांनी मना पासून प्रयास करावेत. श्रीगणराया आंम्हा सर्वांना चांगले निर्णय घेऊन ते आचरणात आणण्याची बुद्धी दे रे बाबा ! गणपती बाप्पा मोरया मंगलमुर्ती मोरया !
जगदीश पटवर्धन
वझिरा बोरिवली (प)
— जगदीश पटवर्धन
Leave a Reply