प्रसवते रोज कविता
कां कशी कोण जाणे…
मीही, होतो संभ्रमित
कसे जमते व्यक्त होणे…
मन हे चंचल पाखरू
त्याचेच कां फडफडणे…
अंतरी काहूर कल्लोळ
भावनांचेच ते प्रसवणे…
मीच शब्दातुनी मांडतो
अव्यक्ताला सहजपणे…
आज हा छंद जीवाला
रिझवितो, हळुवारपणे…
आनंद हा एक आगळा
सहजसुकर होते जगणे…
रचना क्र. ५९
२७/६/२०२३
-वि.ग.सातपुते. (भावकवी)
9766544908
Leave a Reply