चांदणी मी गगनांतील,चमचम,चमचम चकाकती,
कोण आहे तोडीस तोड,
पुढे यावे अंतराळातुनी,—
न कुठला नखरा,
न कुठली रंगरंगोटी,
का न मानावे देवा,
ही त्याचीच किमया मोठी,–!!!
रंग आमुचा नैसर्गिक,
दुधी म्हणू की पांढरा,
लखलखतांना,पुढे-मागे,
कसा दिसे आमुचा तोरा,–!!!
जेव्हा उगवतो आम्ही,
थोडा प्रकाश अवती,
चंद्रराजाचा डामडौल पहा,
चांदण्या त्यात किती रंगती,–!!!
इतरही त्याच्या सर्व सख्या,
पट्टराणी त्याची पौर्णिमा,
कधी–कधीच उगवते ना,
रात्रींमांजी साथ द्याया,–?
आमुचा जथा येई रोज ,
चंद्रम्याच्या बरोबरी,–
त्याविना कसे भागवील,,—
सांगा,तुम्ही आता तरी,–?
© हिमगौरी कर्वे.
Leave a Reply