भाग- ६ वा .
———–
गुरुजींच्या खोलीवर रहायला येऊन चंदरला आता आठ-पंधरा दिवस होऊन गेले होते. चांगल्या माणसाचा सहवास लाभला की “चांगल्या सवयी कशा असतात ? “, हे आपल्याला कळून येते .
हटवादी माणूस जसे दुसऱ्याचे काहीही ऐकून न घेता आपलचं ते खरे ” , असे वागत असतो , “वाईट सवयींचे असेच असते “,
अंगातल्या वाईट सवयींना दूर करणे फार अवघड असते. “आळस, कंटाळा , अजागळ पणा “या सवयी अंगात असल्यावर माणसाला पुढे जाण्याचे रस्तेच बंद होतात.
दुसऱ्याशी व्यवस्थित बोलणे, कुणावर अवलंबून न रहाता स्वत:हाचे काम स्वतः करणे, , वेळेचे महत्व ओळखून काम पूर्ण करणे, फालतू कामात
वेळ न घालवता, चांगल्या गोष्टीत वेळ घालवणे ” या गोष्टी गुरुजींच्या सहवासात चंदर शिकत होते.
गावातील माणसांचे वागणे तो पहात होता. शेतावरुन आलं की , दोन-चार जणांचं टोळकं घरापुढच्या ओट्यावर बसून , नाही तर चावडी जवळ बसून बिड्या फुंकत बसत ,
वायफळ गपा करण्यात त्यांची रात्र सरून जायची. ” या वाया गेलेल्या वेळेची किंमत त्यांना कळत नव्हती.
कारण “वेळेची किंमत
न करणार्यांना ‘ वेळ ही कधी क्षमा करत नाही.”.
आणि या लोकांना हे असे कुणी शिकवत नव्हत, आपणहून समजून येणे त्यांच्या डोक्यात येणे शक्य नव्हते.
” चांगला मित्र भेटणे, चांगला गुरु भेटणे ” या गोष्टी योगायोगाच्या नसून आपल्या नशिबातच असाव्या लागतात.. सकाळी लवकर उठणाऱ्या गुरुजींच्या पाठोपाठ चंदर उठत होता.
आपले शरीर, आपले मन “, निरोगी आणि स्वस्थ ठेवायचे असेल तर त्यासाठी जमेल तेव्हढा व्यायाम केला पाहिजे . ” गेली अनेक वर्षे हा नियम गुरुजी अगदी
कसोशीने पाळत होते.
त्यांची ही सवय चंदर ने आपोआप उचलली. ” घर स्वच्छ ठेवणे , सारे सामान व्यवस्थित ठेवणे , पिण्यासाठी ताजे पाणी भरून ठेवणे ” अशी कामं
करण्यात चंदरचे मन रमत होते.
स्वतः: स्वंयपाक करणाऱ्या गुरुजींनी चंदरला हे हळूहळू शिकवण्यास सुरुवात केली तेंव्हा “स्वतः: च्या हाताने तयार केलेल्या अन्नाची चव खुप वेगळी लागते
हे चंदरला जाणवत होते. ” जसा आहार तसे विचार “, या म्हणीची सत्यता पटवून देतांना गुरुजी सांगायचे- “
ताजे-साधे-सकस अन्न खाणाऱ्याचे मन देखील
साधे-सरळ -सात्विक होत असते.
-आणि जे दिसेल ते खाणाऱ्याचे मन चंचल होते. “,तामसी स्वभावाच्या माणसाच्या आहारात तेज-आणि मसालेदार पदार्थ असतात असे पाहायला मितात.
“अशा शिकवणीतून चंदर घडत होता. उत्तम कारागिराच्या हातात दगड जरी दिला, तरी, शेवटी त्याच्या कुशल हाताने घडवली जाते ती “एक सुंदर आणि सुबक मूर्ती “,.
चंदरच्या कोवळ्या मनावर असे संस्कार गुरुजींच्या सहवासात होऊ लागले.
” योग्य असा गुरु भेटला म्हणजे ” शिष्याच्या जीवनाचे सार्थक होत असते “. चंदरला हे गुरुजी भेटले आणि ज्ञानाचा दीप चंदरच्या हृदयात लावला गेला. या दिव्याच्या
मंगल प्रकाशाने चंदरच्या मनातील अंधारमय जीवन आता उजळून निघणार होते.
अधाश्या सारखा ” चंदर, एकेक गोष्ट शिकण्यास उत्सुक आहे, त्याच्या बुद्धीची झेप फार मोठी आहे ” ,हे आता गुरुजींनी चांगलेच जाणले होते – ते म्हणायचे –
“चंदर – ज्ञान म्हणजे महासागर आहे, या महासागरातून आपल्याला एक मोती जरी वेचता आला तरी आपण स्वतः:ला धान्य समजावे “,
“विद्या म्हणजे सर्वश्रेठ धन आहे !
ज्याच्या संचयाने माणसाला कीर्ती मिळते, या धनाचा कितीही साठा केला तरी तो कमीच आहे. “,
विद्या शिकल्याने माणसात विनय येतो “, विनयशीलता हा गुण व्यक्तीचे भूषण असते “, अशा स्वभावाने सारे जग जिंकता येते .
“ज्ञानी आणि विनयी माणूस सर्वांच्या आदरास पात्र होत असतो. “
आपल्या जवळचे सारे ज्ञान-भांडार मुक्त हाताने चंदरला देत होते आणि चंदरही हे सारे विचार आपल्या मनावर कोरून ठेवीत होता.
गुरुजींच्या शिकवण्यात वेगळीच जादू होती. त्यांनी शिकवलेले प्रत्येक पाठ विद्यार्थ्यांच्या पक्के लक्षात रहात होते. मराठी, इतिहास , भूगोल “, ज्ञानाचे प्रचंड भांडार चंदर आणि मुलांच्या समोर खुले होऊ लागले होते.
गणितातील बेरीज- वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार ही मंडळी चंदरला जवळच्या मित्रा सारखी वाटू लागली.
गुरुजींच्या खोलीवरची वर्दळ आता खूप वाढली होती. गुरुजींच्या जवळ रहाणारा चंदर आता खूप खूप हुशार झाला आहे “, हे लक्षात येऊ लागल्या मुळे “,आपल्याही पोराने
असेच शिकावे “, असे वाटणाऱ्या आई-बापांची संख्या वाढू लागली. दोन-चार महिन्यांच्या काळातच पाच-पंचवीस पोरं गुरुजींच्या समोर बसून काही-ना काही
शिकत आहेत हे सगळ्यांना पहायला मिळू लागले.
रावसाहेबांची फेरी अधून-मधून होत असायची. पुस्तकात रंगून गेलेली मुले पाहून त्यांना आनंद वाटायचा. “पुढच्या वर्षी आपल्या गावात शाळा सुरु होण्यात आता अडचण
निर्माण होणार नाही ” या बद्दलची खात्री पटली. कशाची ही अपेक्षा न ठेवता दुसर्या साठी सदैव काही चांगले वागणाऱ्या पैकी “रावसाहेब होते “.
चौथीच्या वर्गाची परीक्षा देता येईल अशी तयारी गुरुजींनी काही मुलांच्याकडून करून घेतली, इतके दिवस या मुलांना केवळ शाळा नव्हती म्हणून शिकता आलेले नव्हते “,
या पोरांची पात्रता खूप मोठी आहे “, हे गुरुजींना जाणवत होते.
एक दिवस तर गुरुजींनी या पोरांची परीक्षाच घेऊन पाहिली. पेपरमधले सर्व प्रश्न या पोरांना सोडवता आले आहेत “,
हे पाहून गुरुजींनी निर्णय घेऊन टाकला –
“आता या पोरांना घेऊन तालुक्याच्या गावी जायचे, बोर्डाच्या परीक्षेला बसवायचे. पाहू तर खरे – यश मिळते की नाही ?
असे ठरवून एक दिवस, गुरुजी आणि स्वतः: रावसाहेब तालुक्याच्या गावी आले. ऑफिस मध्ये जाऊन त्यांनी शिक्षण-अधिकारी साहेबांची भेट घेतली –
” गावातील परिस्थितीचे वर्णन गुरुजींनी केले, येणाऱ्या सर्व अडचणी साहेबांच्या समोर मांडल्या. साहेबांना गुरुजींच्या शब्दातली कळ कळ आणि तळमळ जाणवली असावी .
“आजच्या दिवसात परिस्थिती बिघडलेली असतांना हा माणूस आड-वळणाच्या गावात राहून , दुसऱ्यांनी शिकावे “,
यासाठी धडपडतो आहे ” अशा निस्वार्थ भावनेचे दर्शन
आजकाल दुर्मिळ झाले आहे.हे जाणवून
शिक्षणाधिकारी साहेब म्हणाले-
गुरुजी, तुमच्या सर्व भावना मला समजल्या, तुमचे कार्य अजोड असेच आहे. तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना चौथीच्या परीक्षेला बसवू शकता “..!
याबाबतीत हवे असणारे सर्व सहकार्य तुम्हाला माझ्या कडून निश्चित मिळेल .
आपल्या प्रयत्नांना एवढे यश मिळेल “, याची कल्पना गुरुजींनी केली नव्हती.
रावसाहेबांना खूप आनंद झाला ते म्हणाले –
गुरुजी , तुमच्या प्रयत्नांना आज यश आले आहे. शिकण्यापासून माझ्या गावातील पोरं दूर राहिली असती. आज केवळ तुमच्यामुळे या पोरांना शिकायला मिळतंय, आणि यापुढेही
मिळणार आहे “.
गुरुजी, परीक्षेसाठी जो काही खर्च लागणार असेल , त्याची काळजी तुम्ही करायची नाही . पोरांना व्यवस्थित न्यायचं, परीक्षेला बसवायचं ,हेच फक्त तुम्ही करायचं ..!
पैशाची काळजी अजिबात करायची नाही, त्या साठी मी आहे की ..तुमच्या पाठीशी….!
(क्रमश:)
— अरुण वि.देशपांडे
मो- 9850177342
Leave a Reply