हे शशिधरा तूं प्रेमळ सखा साऱ्या विश्वाचा
सौंदर्याचे प्रतिक असूनी राजा तूं नभाचा
लागूं नये तूज दुष्ट म्हणूनी काजळ लावी तुला
काही वेडे त्यास समजती तू डागाळला
डाग कसला तुम्ही मानतां प्रेमामध्ये तो
दोन मनांतील पवित्र नाते हे आम्हीं विसरतो
समजूं शकतो नीती बंधन समाज रचनेचे
बळजबरीच्या कृत्यास तुम्ही म्हणावे पापाचे
गुरू पत्नीशीं प्रेम करिता लौकिक गेला तो
दोघांची साथ ती मिळतां गुन्हा कसा होतो ?
एक दिशेने प्रेम साधतां अर्धवट राही
दोघांमधली मनाची ओढ ती समाधान देई
‘नीती मार्गे’ कुणी म्हणतील चंद्रकृत्य चुकले
प्रेमाच्या परि अथांग सागरी तळांत ते बुडाले
डॉ. डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Leave a Reply