ठेवून पाऊल चंद्रावरी अभिमान तुला वाटला
मान उंचावूनी आपुली वर्णन करीता झाला ।।१।।
चंद्र आहे ओबड धोबड तेथे सारे खडकाळ असे
झाडे झुडपे पशु पक्षी हवा पाणी कांही नसे ।।२।।
नमुने आणले दगड मातीचे चंद्रावरी तू जाऊन
शुष्क आहे वातावरण असेच केले वर्णन ।।३।।
बघितले बाह्य रूप ह्या रजनीकांताचे
थोटका पडलास तू शोध घेण्या अंतरीचे ।।४।।
तेच आहे मधुर चांदणे चंद्रातील शितलतेचे
आजही वाटतो आल्हाद बघता रूप पौर्णिमेचे ।।५।।
चंद्र आहे कवीची स्फूर्ती बालकाचे तोच गीत
प्रेमिका देण्या आनंद मग्न तो सदोदित ।।६।।
चंद्र आहे मुकुट मणी निसर्गाच्या सौंदर्याचा
ऐकून त्याचे बाह्य रूप आनंद कमी न होई त्याचा ।।७।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
e-mail- bknagapurkar@gmail.com
Leave a Reply