“ पिण्डजप्रवरारूढा चण्डकोपास्त्रकैयुर्वा |
प्रसादं तनुते महयं चन्द्रघण्टति विश्रुता ||”
अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून सुरु होणाऱ्या, नवरात्रात दुर्गेच्या नऊ रूपांची जी आराधना केली जाते, त्यातील तिसरे स्वरूप म्हणजे चंद्रघण्टा होय. नवशक्तीतील तृतीय आराध्य देवी चंद्रघण्टा चे स्वरूप अतिशय शान्तिदायक आणि कल्याणकारी असून देवीच्या मस्तकावर घंटेच्या आकाराचा अर्धचंद्र आहे. या कारणानेच देवीस “चंद्रघण्टा” असे संबोधले जाते. या देवीच्या शरीराचा रंग सुवर्णासारखा चमकदार असून तिला दहा हात आहेत. वाहन सिंह असून, सिंहावर आसनस्थ आहे. देवीच्या दहाही हात खड्ग, त्रिशूल, गदा, धनुष्य, बाण आदी शस्त्रांनी विभूषित आहेत. नाद, स्वर आणि लय यांची ही देवी आहे, देवीच्या आराधनेने आवाजात दिव्या तेज आणि अलौकिक सौंदर्य प्राप्त होते. देवीची मुद्रा कायम तत्पर असून, मुखमंडल तेजोमय आहे. युद्धासाठी सदैव तत्पर असलेल्या देवीच्या चण्डध्वनिने दानवांची तारांबळ उडावि असेच अलौकिक स्वरूप आहे. या दिवशी आराधना करतांना योगी “मणिपूर चक्रावर” ध्यान केंद्रित करून उपासना करतात.
चंद्रघंटा स्तोत्र पाठ
“ आपदुध्दारिणी त्वंहि आद्या शक्तिः शुभपराम्।
अणिमादि सिध्दिदात्री चंद्रघटा प्रणमाभ्यम्॥
चन्द्रमुखी इष्ट दात्री इष्टं मन्त्र स्वरूपणीम्।
धनदात्री, आनन्ददात्री चन्द्रघंटे प्रणमाभ्यहम्॥
नानारूपधारिणी इच्छानयी ऐश्वर्यदायनीम्।
सौभाग्यारोग्यदायिनी चंद्रघंटा प्रणमाभ्यहम्॥”
Leave a Reply