लोकसत्तामधील पंकज भोसले यांचा चंद्र्कांत काकोडकर यांच्यावरील लेख वाचला आणि सर्व काही आठवले शाळेतील आणि कॉलेजमधील दिवस. राजेश खन्ना यांचा दो रास्ते हा चित्रपट त्यांच्या नीलांबरी कादंबरीवर घेतलेला होता ह्या चित्रपटाला फिल्मफेअरची ७ नामाकने होती पण बाकी कुणालाही पुरस्कार न मिळता फक्त चंद्रकांत काकोडकर यांना कथेवरील पुरस्कार मिळाला होता . त्यांची श्यामा कादंबरी त्याचवेळी कायद्याच्या कचाट्यात संस्कृती रक्षकाकडून सापडली होती.
सम्पूर्ण लहानपण मला आठवले. खरे तर सानेगुरुजी कथामाला वगैरे त्यावेळी जोरात असत. पण आमच्या वाढत्या वयावर प्रभाव होता तो बाबुराव अर्नाळकर आणि चंद्रकांत काकोडकर यांचा , अर्थात आमच्यावेळी ती वयाची गरज होती. आतासारखे एक बटन दाबले की काहीही बघू शकतो. इतकी सुबत्ता नव्हती ? पुस्तकात पुस्तक घालून इतके मनपूर्वक वाचन होई की तितका कधी अभ्यासही केला नव्हता. त्यावेळी संस्कार , संस्कृती वगैरे भरपूर होते पण आमची वये ते जुमानत नसत.
आज तर तरुण पिढी तर ह्या दोन्ही गोष्टी अँटिक पीस म्ह्णून बघतात ? तरीपण आज ह्या दोन गोष्टीचा राजकीय पगडा आहेच हे मान्य करावेच लागेल.
हिंदी चित्रपट बघताना झुडुपाच्या मागे काय ? ह्या आमच्या प्रश्नाला उत्तर काकोडकर यांच्या कादंबऱ्या देत.
आहे ना गम्मत , अहो ती वयाची गरजच असते अर्थात ज्यांची नव्हती किंवा ज्यांना गरज वाटली नाही तो भाग वेगळा.
पण थँक्स लोकसत्ता आणि पंकजी भोसले खूप मागे नेलेत हो , अहो अर्नाळकर आणि काकोडकर आमच्या वयाची गरज होती ?
अर्थात काहीजण मान्य करणार नाहीत असो ?
— सतीश चाफेकर.
Leave a Reply