नाट्यनिर्माता मोहनवाघ यांनी आपल्या ‘चंद्रलेखा’ या नाट्यसंस्थेतर्फे ‘नटसम्राट’ नाटक नव्याने रंगमंचावर आणलं होतं.
‘चंद्रलेखा’च्या ‘नटसम्राट’मध्ये यशवंत दत्त ‘आप्पासाहेब बेलवलकर’ होते, तर सुलभा देशपांडे यांनी ‘कावेरी’ यांची भूमिका केली होती. शांता जोग या नामांकित अभिनेत्रीची ‘कावेरी’ या भूमिकेवर जबरदस्त छाप होती. त्यामुळे सुलभा देशपांडे यांच्या समोर एक आव्हानच होतं. या नाटकाचा पहिला प्रयोग दि गोवा हिंदूअसोशिएशन, कला विभाग या संस्थेने २३ डिसेंबर १९७० रोजी बिर्ला मातोश्री सभागृह, मुंबई येथे सादर केला होता. आजवर ही भूमिका श्रीराम लागू, दत्ता भट, सतीश दुभाषी, यशवंत दत्त, उपेंद्र दाते यांनी साकारली आहे.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply