नवीन लेखन...

चंदू बोर्डे

१९६० च्या दशकात भारतीय क्रिकेटचा हुकुमी आधारस्तंभ असलेले अष्टपैलू खेळाडू व प्रशासक चंदू बोर्डे यांचा जन्म २१ जुलै १९३४ रोजी पुणे येथे झाला.

चंदू बोर्डे यांचे पूर्ण नाव चंद्रकांत गुलाबराव बोर्डे. चाहते त्यांना “चंदू’ या लाडक्याव नावानेच संबोधित. विजय हजारे हे त्यांचे फलंदाजीतील आदर्श होते. १९६४ साली खेळताना त्यांच्या खांद्याला दुखापत झाली. त्यामुळे नंतर बोर्डे गोलंदाजी करू शकले नाहीत. उर्वरित कारकीर्द त्यांनी जास्ती करून फलंदाज म्हणूनच गाजवली.

१९५४-५५ च्या मोसमात ते प्रथम रणजी सामन्यात गुजरात विरुद्ध बडोदा संघाकडून खेळले. १९६४ पासून ते महाराष्ट्रातर्फे खेळू लागले. काॅन्ट्रॅक्टर, पाॅली उम्रिगर, रामचंद, सुभाष गुप्ते अशांचा कालखंड जेव्हा चालू होता, त्या काळात १९५८ साली चंदू बोर्डे मैदानावर उतरले. नंतर १९७२ पर्यंत ते मधल्या फळीतील फलंदाज म्हणून खेळत राहिले.

कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर संघ व्यवस्थापक, निवड समितीचे सदस्य व अध्यक्ष म्हणून त्यांनी सेवा बजावली. वेस्ट इंडिज दौऱ्यात १९५८ मधे चंदूबोर्डेंना कसोटीत खेळण्याची संधी मिळाली. इंग्लंडविरूद्ध भारताला पहिला विजय मिळवून देणाऱ्या १९६२ च्या मालिकेत त्यांची कामगिरी लक्षणीय होती. दुसऱ्या कसोटीत पाच बळी मिळवून त्यांनी भारतीय विजयाचा पाया रचला. १९६४ मध्ये मुंबईत ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना संघाचे आठ गडी बाद झालेले असताना बोर्डेंनी हिंमतीने किल्ला लढवला व अशक्यप्राय वाटणारा विजय मिळवून दिला. त्यावेळी प्रेक्षकांनी त्यांना डोक्यावर घेतले. त्यावेळी त्यांची बॅट गेली ती त्यांना परत मिळालीच नाही.

१९६८ मध्ये बार्बाडोसमध्ये झालेल्या सामन्यांत विश्व संघात समावेश झालेले ते एकमेव भारतीय होते. चंदू बोर्डे यांनी ३५.५९ च्या सरासरीने ५५ कसोटी सामन्यात ३०६१ धावा केल्या.त्यावेळी सर्वोत्तम भारतीय फलंदाज होते. त्यांनी ५५ कसोटीत ४६.४८ चे सरासरीने ५२ बळी मिळवले होते. प्रथम श्रेणी स्तरावर त्यांनी ३३१ विकेट्‌स घेतल्या तर २८०५ धावा काढल्या होत्या. कसोटीमध्ये त्यांनी एका डावात ५ बळी घेतले होते. कसोटीमध्ये ३७ झेलही घेतले व प्रथमश्रेणी सामन्यांत १६० झेल घेतले. गुणवत्ता व ज्येष्ठता असूनही त्यांना कर्णधारपद केवळ एकाच सामन्यांत मिळाले, हे दुर्दैव. दोन्ही डावांत शतक झळकवण्याचा त्यांचा विक्रमही केवळ चार धावांनी हुकला.

युवकांना क्रिकेटमधील विशेष प्रशिक्षण आणि मार्गदर्शन देण्यासाठी ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूल (जीआयआयएस) यांच्या वतीने इंदूर येथे २०१२ पासून चंदू बोर्डे ग्लोबल क्रिकेट अकादमी (सीजीजीसीए) सुरू करण्यात आली. चंदू बोर्डे यांनी बीसीसीआयच्या निवड समितीचे अध्यक्ष म्हणूनही काही काळ काम केले. चंदू बोर्डे यांना १९६६ मध्ये अर्जुन पुरस्कार, १९६९ मध्ये पद्मश्री; तसेच २००२ साली भारताचा तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मभूषण मध्ये देऊन गौरविण्यात आले.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..