नवीन लेखन...

३७० कलम काढल्यानंतर जागतिक स्तरावर बदलती समीकरणे

३७० कलम काढल्यानंतर पाकिस्तानची अवस्था बिकट झाली आहे. आपल्या युद्धाच्या इशाऱ्यात दम नसल्याचा साक्षात्कार इमरान खान यांना १६ सप्टेंबरला झाला व त्यांनी स्वतःच आपल्या देशाची, लष्कराची व शस्त्रास्त्रांची लक्तरे काढली. भारताविरोधात पारंपरिक किंवा समोरासमोरच्या युद्धात आपला निभाव लागणार नाही तर आपण तोंडावरच आपटू, असल्याची कबुलीच इमरान खान यांनी दिली. याचाच अर्थ पाकिस्तानचा डाव दहशतवादी, आत्मघाती, फिदायीन, जिहादी हल्ले करण्याचाच आहे, हे स्पष्ट होते. परंतु, तसे काही झालेच तर इमरानना स्वतःचा  देश वाचवता वाचवता नाकी नऊ येतील, हे नक्की!

काश्मिरींवरील अन्यायाच्या खोट्या कहाण्या रंगवणाऱ्या इमरान खान यांनी बलुचिस्तान, पख्तूनिस्तान व सिंधमध्येही जरा डोकावून पाहावे. चीनमधील उईगुर मुस्लिमांचे उदाहरणही तसेच. काश्मिरींची काळजी वाहणाऱ्या इमरान खान यांना उईगुर मुस्लीम कोण आणि चीनने त्यांच्यावर काय काय अत्याचार चालवलेत त्याची जराही माहिती नाही! चिनी सरकारच्या जुलूमजबरदस्तीने श्वास कोंडलेल्या उईगुरांच्या बातम्या वृत्तपत्रांत छापून येत नाहीत व त्यामुळे आपल्याला त्याची कल्पना नाही, असे इमरान खान म्हणाले.

इस्लामी सहकार्य परिषदेत धक्का

‘ऑर्गनायझेशन फॉर इस्लामिक कोऑपरेशन’ (ओआयसी) या इस्लामी सहकार्य संघटनेबरोबर भारताने घनिष्ठ राजनैतिक, व्यापारी आणि आर्थिक संबंध प्रस्थापित केले आहेत. तथापि, पाकिस्तानने ‘ओआयसी’मध्ये इस्लामच्या एकजुटीचा राग आळवत भारताविरोधात प्रस्ताव आणला. परंतु, वास्तवात त्या प्रस्तावांचे मूल्य शून्यच होते. परंतु, या प्रश्नावर एकाही मुस्लीम राष्ट्राने पाकिस्तानला सहकार्य करण्याची भूमिका घेतली नाही. ह्यामुळे पाकिस्तानी राज्यकर्त्यांना धक्का देणारा बसला.

पाकिस्तानच्या पारंपरिक आखाती देशातील सहकाऱ्यांपैकी कोणीही भारताच्या राज्य विभाजनाच्या निर्णयाचा निषेध केला नाही ना ‘कलम ३७०’च्या निष्प्रभीकरणावर सवाल केला, हा पाकिस्तानसाठी मोठा दुःखाचा विषय आहे. दुसरीकडे भारताला विरोध करण्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदींना काही मुस्लीम राष्ट्रांनी (संयुक्त अरब अमिरातीने दिलेला ‘ऑर्डर ऑप झायेद पुरस्कार’) सन्मानित केले आणि तेही काश्मिरात ‘कलम ३७०’ काढले असताना! पाकिस्तानमधील दैनिकानुसार काश्मीरविषयक घटनाक्रमावर चर्चा करताना एका प्रमुख सिनेटरने सिनेटमध्ये असे ठामपणे सांगितले की, “आताची वेळ ही पाकिस्तानने (संयुक्त राष्ट्रसंघाहूनही वाईट अवस्था झालेल्या) ‘ओआयसी’तून बाहेर पडण्याची आहे.” पाकिस्तान सध्या इस्लामी देशांमध्ये एक मोठी लष्करी शक्ती आहे आणि त्याच्याजवळ आण्विक शस्त्रे आहेत. परंतु, पाकिस्तानमध्ये राजकीय स्थैर्याची कमतरता,पाक सै न्याची कार्यक्षमता(??) त्याची दिवाळखोर आर्थिक स्थिती त्या देशाला काश्मिरवर दुःसाहसकरू देत नाही .

19 तारखेला संयुक्त राष्ट्राचे अधिवेशन सुरू होत असून, 27 तारखेला भारत व पाकिस्तान दोन्ही देशांचे पंतप्रधान संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनाला संबोधित करणार आहेत. या काळात संयुक्त राष्ट्र अधिवेशनात घडणार्‍या घडामोडी महत्त्वाच्या ठरणार आहेत.

काश्मीरबाबत पाकिस्तानची बाजूदेखील ऐकून घ्यायला जगातील (तुर्कस्तान व चीन सोडला तर) एकही देश तयार नाही. पाकिस्तानी जनतेला बाकी जगाकडून इतकी आशा नव्हती, जितकी आखाती देशांकडून होती. सौदी अरब, संयुक्त अरब अमिरात इत्यादी देशांकडून आपली पाठराखण होईल, याची त्यांना खात्री होती. परंतु, तिकडून सहानुभूतीचा एक शब्दही आला नाही. उलट, हा भारताचा अंतर्गत मामला आहे, असे उत्तर मिळाले. तेव्हा मात्र पाकिस्तानी जनता बावचळून गेली. याचे कारण, पाकिस्तानी जनता या अरब देशांशी भावनिकदृष्ट्या जुळली गेली आहे.  

पाकिस्तानी लष्कराकडून अपेक्षाभंग

दुसरा धक्का म्हणजे पाकिस्तानी लष्कराकडून झालेला अपेक्षाभंग. प्रत्येक पाकिस्तानी आपल्या लष्कराला जगातील श्रेष्ठ लष्कर मानतो. आण्विक अस्त्रे, क्षेपणास्त्रे आणि सुमारे आठ लाख कडवे जवान यांच्या भरवशावर आपण भारताला कधीही नमवू शकतो, असा एक विश्वास त्यांच्या मनात निर्माण करण्यात आला आहे. भारतासोबतची चार युद्धे पाकिस्तान हरला नसून, राजकीय नेतृत्वाने मध्येच कच खाल्ल्यामुळे पाकिस्तानी लष्कराला माघार घ्यावी लागली, असेच प्रत्येक पाकिस्तानी जनतेत ठसविण्यात आले आहे. त्यामुळे कलम 370 निष्प्रभ करून काश्मीर राज्याचा दर्जा एका केंद्रशासित प्रदेशाचा केल्यानंतर आपले लष्कर तत्काळ काहीतरी कारवाई करून भारताला नमते घेण्यास भाग पाडेल, याची प्रत्येक पाकिस्तानीला जवळजवळ खात्री होती. परंतु, तसे काहीही झाले नाही. पण, तरीही अजूनही कुणीही पाकिस्तानी आपल्या लष्कराला दोष देत नसल्याचे दिसून येते. त्यांचा सर्व राग आता इम्रान खान आणि त्याच्या सरकारवर निघत असतो.

नरेंद्र मोदी यांनी गेल्या पाच वर्षांत जगभर सतत दौरे करून पाकिस्तानविरुद्ध असे काही वातावरण निर्माण केले आहे की तो एकाकी पडला आहे. 5 ऑगस्टला कलम 370 निष्प्रभ केल्यानंतर पाकिस्तान अरब देशांकडे मदतीची भीक मागत होता आणि संयुक्त अरब अमिरात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपल्या देशात सन्मानाने बोलावून त्यांना देशाचा सर्वोच्च पुरस्कार बहाल करत होता. हे म्हणजे पाकिस्तानच्या जखमेवर तिखटमिश्रित मीठ चोळणेच झाले. पाकिस्तानी जनतेला खरेच काय करावे, हे समजेनासे झाले आहे. सारे जग आपल्या इतके विरोधात कसे काय गेले, याचाच ती विचार करत आहे.

देशांतर्गत राजकारणात मोठी कोंडी

इम्रान खानचीही देशांतर्गत राजकारणात मोठी कोंडी झाली आहे. भ्रष्टाचार्‍यांना तुरुंगात टाकीन, असे वचन देत इम्रान खान सत्तेत आले. घोषणेनुसार त्यांनी माजी पंतप्रधान नवाझ शरीफ व शाहीद खाकन अब्बासी तसेच माजी राष्ट्राध्यक्ष आसिफ अली जरदारी यांना तुरुंगात टाकले आहे. नवाझ शरीफ यांची मुलगी मरियम, सरकारविरुद्ध वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करीत होती म्हणून तिलाही तुरुंगात डांबण्यात आले आहे. इम्रान खान यांच्या या कृतीने पाकिस्तानातील विरोधी पक्ष बिथरले आहेत. ते कुठल्याही मुद्यावर इम्रान खानला सहकार्य करण्याच्या मानसिकतेत नाही.

इकडे भारतानेही कलम 370 निष्प्रभ करण्याची खेळी खेळण्यासाठी जी वेळ निवडली, ती अत्यंत अचूक अशी होती. सध्या पाकिस्तानची अर्थव्यवस्था भिकेला लागली आहे. चीनचा वन बेल्ट वन रोड प्रकल्प अधांतरी असल्यातच आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान जगभर भिकेचा कटोरा घेऊन फिरत आहेत. युद्ध झालेच तर त्याचा खर्च पाकिस्तानला झेपणार नाही.

काश्मीर खोर्‍याबाबत भारताचा अंतर्गत निर्णय

काश्मीर खोर्‍याबाबत भारताने घेतलेला निर्णय हा भारताचा अंतर्गत निर्णय आहे, त्यात इतर देशांनी हस्तक्षेप करण्याची गरज नाही, ही भारताची ठाम भूमिका आहे व ती बहुतेक सार्‍या देशांनी मान्य केली आहे. मात्र काही विदेशी प्रसारमाध्यमे व काही देशातील राजदूत, यांनी खोर्‍यातील संचारबंदी उठवून, इंटरनेट सेवा बहाल करण्याची मागणी करत आहे. कलम 370 बाबत कोणत्याही देशाने काहीही म्हटलेले नाही. त्यांच्या मागण्या आहेत, सर्व राजकीय कैद्यांना सोडण्यात यावे व लवकरात लवकर राज्यात निवडणुका घेण्यात याव्या. आणि पाकिस्तान नेमक्या याच मागण्या संयुक्त राष्ट्रांसमोर करणार आहे.

काश्मिरींवरील अन्यायाच्या खोट्या कहाण्या रंगवणाऱ्या इमरान खान यांनी स्वतःच्या देशात बलुचिस्तान, पख्तूनिस्तान व सिंधमध्येही डोकावून पाहावे.

काश्मिरींची काळजी वाहणाऱ्या इमरान खान यांना उईगुर मुस्लीम कोण आणि चीनने त्यांच्यावर काय काय अत्याचार चालवलेत त्याची जराही माहिती नाही! हे खरे आहे का? आज लाखो उईगुर मुस्लीम तुरंगात आहेत.

आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला मिळत असलेला मानसन्मान पाकिस्तानी जनतेला सतत खुपत असतो. असा सन्मान पाकिस्तानला का मिळत नाही, याच्यावर आता विचारविमर्श सुरू झाला आहे.एक गोष्ट नक्की की, पाकिस्तान सरकार व लष्कर हवालदिल झालेच आहेत; परंतु सर्वसामान्य जनतादेखील दिङ्‌मूढ झालेली आहे. 5 ऑगस्टनंतर पाकिस्तान टीव्हीवरील दररोज होणार्‍या विविध चर्चा ऐकल्यानंतर पाकिस्तानची ही अशी सैरभैर अवस्था स्पष्टपणे लक्षात येते. पाकिस्तान सरकार, मंत्री, लष्कराचे प्रवक्ते, सामान्य जनता यांच्या ज्या भारतविरोधी जहाल भाषेतील प्रतिक्रिया ऐकल्या की, त्यांनी उसने अवसान आणले असल्याचे लक्षात येते. या सर्व प्रतिक्रिया बाजूला ठेवून पाकिस्तानात गेल्या दिड महिनाभरापासून जे विचारमंथन सुरू आहे, त्याकडे नीट लक्ष दिले तर ध्यानात येईल की, मोदी सरकारने हे जे पाऊल उचलले आहे त्याने नजीकच्या काळात पाकिस्तानचे घरगुती तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील राजकारण पुरते बदलून जाणार आहे.

— ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) 

ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)
About ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) 288 Articles
ब्रिगेडियर हेमंत महाजन हे राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर नियमितपणे लेखन करत असतात. त्यांचे लेख मराठीतील अनेक वर्तमानपत्रांत नियमितपणे प्रसिद्ध होतात. अनेक दूरचित्रवाणी वाहिन्यांवर ते नियमितपणे तज्ज्ञ वक्ते म्हणून कार्यक्रमांत सहभागी असतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..