माझे मन आहे चण्याची पुडी
जड विचारांची तळाशी बुडी
भरले आहेत चणे फुटाणे
तेच चव साधती साधेपणे
मावत नाही काजू अक्रोड
कशास हवी ती डोकेफोड ?
लांब ठेविले बदाम मनुके
यास्तव मन हे हलके फुलके
चणा वाटतो आपलाच सहज
बाकी भासती किंमती ऐवज
नको बेदाणे खारीक पिस्ते
तेच घडविती विवाद नस्ते
चघळत बसतो एक चणा
मुरवत त्यातील साधेपणा .
-अजित देशमुख .
Leave a Reply