नवीन लेखन...

चापडा

हिरव्यागार डोंगररांगा आणि लांबच लांब खाडी किनार यांच्या बेचकीत वसलेलं ठाणे शहर. निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या ठाणे जिल्ह्यात वन्यजीव संपदा अमाप अशीच पाहायला मिळते. शेकडो फुलपाखरं, पक्षी, कीटक, प्राणी, वनस्पती,फुलं, सरपटणारे प्राणी अशी निसर्गाची नाना रूपाचंदर्शनच आपल्याला या ठाण्यात होतं. कॅमेराबद्ध केलेल्यानिसर्गाच्या याच वेगळ्या छटा,त्यांची शास्त्रीय माहिती आणि हे फोटो टिपण्यासाठी वापरलेलं फोटोग्राफीचं तंत्रज्ञान या सगळ्याचा मागोवा घेणारा सदर ठाण्याची वनजीवन संपदा.


डोंगराळ  माळरानांनी सजलेल्या विस्तृत ठाण्याच्या जंगलात सरपटणाऱ्या प्राण्यांची संख्या तशी फार. देशभर आढळणाऱ्या अनेक सापांच्या प्रजातींपैकी काही प्रजाती या आपल्या शहराला लागून असलेल्या जंगलात आजही मोठ्या संख्येने आपलं अस्तित्व टिकवून आहेत. खरंतर भारतात आढळणाऱ्या सापांची संख्या तशी फार असली तरीही यातील काही जाती विषारी आहेत. विषारी सापांचा आढळ हा विविध ठिकाणी पाहायला मिळतो. घनदाट जंगलात, डोंगररांगांजवळ, गवताळ भागात, पाणवठ्याजवळ, दगड कपारीत तर काही विषारी साप हे मनुष्यवस्तीजवळ ही सापडतात. एकूण विषारी सापांपैकी मनुष्यवस्तीजवळ प्रामुख्याने सापडणारे असे चार विषारी साप असून हे साप अन्नाच्या शोधात मनुष्यवस्तीजवळ येतात. या चार सापांनंतर मनुष्यवस्तीजवळ आढळणारा अशा सापांच्या यादीत चापडा या विषारी सापाची गणना करता येईल.

जगाच्या पाठीवर सापांच्या अनेक जाती उपजाती पाहायला मिळतात. या सापांना राहण्यासाठी आवश्यक असलेल्या अनुकूल वातावरणानुसार यांचा अधिवास त्या त्या ठिकाणी पाहायला मिळतो. मात्र, या चापडा सापाचा अधिवास हा केवळ भारतातच आणि त्यातही पूर्व आणि पश्चिम घाटाच्या पट्ट्यातच हा चापडा साप आढळतो. आपल्या भारतात अनेक ठिकाणी याचा आढळ असून याच्या रंगात तसेच आकारात ठिकाणानुसार काहीसा फरक आढळून येईल.

या सापाची नोंद आपल्या इथे माथेरान, कोयना, भंडारा, महाबळेश्वर, कोल्हापूर, अंबोली, कर्नाटक या सारख्या भागात डोंगरावरील जंगलात हा बांबू पिट व्हायपर अथवा चापडा सहज सापडतो.आपल्या मुंबईत संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, ठाण्यात येऊर, नागला बंदर, ओवळा इथलं जंगल, कल्याण-डोंबिवली नजीक गांधारी, निळजे या परिसरात तसेच नवी मुंबई, पनवेल, उरण इथे हा साप सापडतो.

चापडा हा साप व्हायपर या सापांच्या प्रकारात मोडतो. व्हायपर या जातीचे असे तसे रागीट आणि फारच चिडखोर असे असतात. आपल्या इथे मनुष्यवस्तीजवळ सापडणाऱ्या चार सापांपैकी दोन्ही व्हायपर या प्रकारातलेच आहे. नाग, मण्यार या सापांशिवाय फुरसं म्हणजेच साउस्केल व्हायपर आणि गुणच म्हणजेच रसल व्हायपर हे चार विषारी साप मनुष्यवस्तीजवळ अधिक येतात ते उंदीर, पाली यांच्या शोधात. या सापांचा दंश हा अनेकदा न कळत यांच्याजवळ गेल्याने वा अपघाताने सर्वाधिक झाल्याचं लक्षात येतो.

छायाचित्राची तांत्रिक माहिती
ठाण्यातल्या येऊरच्या जंगलातील पाठवणा पाडा या भागात सापडा सापाचं हे छायाचित्र मी टिपले आहे. चापडा साप अतिशय विषारी असल्याने याची फोटोग्राफी करताना फार काळजी घ्यावी लागली होती.

या छायाचित्रासाठी कॅननचा ५० डी कॅमेरा आणि टॅमरॉनची ९० मीमीची मायक्रो लेन्स वापरली आहे. कॅमेर्‍यात अपार्चर एफ ५.६, शटरस्पीड १/६० आणि आयएसओ ४०० ठेवून हे छायाचित्र घेतले गेले आहे.

(“पुढारी” मध्ये पूर्वप्रकाशित)

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..