अस्थिर चिचीं, काय तोडिले तारे, येऊनि जन्मास भूवरी,
राहूनि तोर्यात, चाल मस्तीत स्वार होतो कल्पनेवरी ।
नैराश्य ग्रासते मनां, नसतां, अपुलाच विश्वास अपुल्यावरी,
उमगले वेळीच, धरणे कांस ईषाची, तोच जीवनाची कैवारी ।।
आहे तोच जीवनाची कैवारी ।।१।।होतो जाणूनि मनीं, क्षणभंगूरता पुरती, या नश्वर देहाची,
नाही तरीही बाळगली, तसुभरी तमा, जगीं कसली कशाची ।
देत सदा असतां, दोष इतरां, ढकली शांती अपुल्याच मनाची,
गवसला मार्ग चिन्मयाचा, मनां लागताच गोडी नामस्मरणाची ।
मनां लागताच गोडी नामस्मरणाची ।।२।।अहंकार होता मनांत, वाकणे कधी ठावूक नव्हते या देहास,
वाटले, आहोत आम्ही तल्लख फार, चाल होती मोठ्या ऐटीत ।
होताच हृदवेदनाचा जरा आघात, झालापुरताच भ्रम निरास,
क्षणी, जाग आली चित्तास, निरामय आनंद आहे हरी चिंतनांत ।।
निरामय आनंद आहे हरी चिंतनांत ।।३।।

ईप्सीत जीवनांचे कष्ट, नव्हता वेळ, ते जाणून घेण्यास,
होती कल्पना वृथा, वाटले सौख्य वसते, वस्तूंच्या संग्रहात ।
कळले जरा उशिरा हे आम्हां, सुखाचा होता तो बेगडी आभास,
दासगुरू वेद, स्वानंद आहे, राहुनि लीन, ताई चरणकमळांत ।।
राहुनि लीन, ताई चरणकमळांत ।।४।।
– गुरुदास / सुरेश नाईक
— सुरेश वासुदेव नाईक उर्फ गुरुदास
Leave a Reply