नवीन लेखन...

डार्विन आणि माकड

Charles Darwin And Monkey

सध्या चार्लस् डार्विन आणि त्याचा माकड सगळीकडे धुमाकुळ घालतोय….

अनेकजण जणु काय डार्विनला आपण कोळून प्यालोय, अशा आविर्भावात बोलतायत…(जसं क्रिकेटबद्दल बोलताना प्रत्येकजण एक्सपर्ट कॉमेन्टेटर असल्यासारखा बोलतो, तसं..) खरंतर यापैकी कितीजणांना डार्विन, त्याचं ते जगप्रसिद्ध पुस्तक आणि क्रांतिकारक सिद्धांत याच्याबद्दल किती माहिती आहे, हे त्यांचं त्यांनाच माहित. पुरातत्व विषयाचा अभ्यास करताना चार्लस् डार्विनची थोडीशी तोंडओळख झाली होती. खरंतर उत्क्रांतीचा अभ्यास करताना आपण त्याला टाळून (कितीही वाद-प्रवाद असले तरी) पुढे जाऊच शकत नाही.

तर ते असो…चार्लस् डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धांत आणि त्याचं १८५९ साली प्रसिद्ध झालेलं जे पुस्तक गाजतंय, त्याचं नाव आहे ‘On the Origin of Species by Means of Natural Selection or the Preservation of Favoured Races in the Struggle for Life’ (अबब…!) तर मुळात या पुस्तकात डार्विननं ‘माकडापासुन माणुस झाला’ असं कुठेही म्हटलेलं नाहीये. ब्रिटनमध्ये जन्मलेला चार्लस् डार्विन ( १२ फेब्रुवारी १८०९-१९ एप्रिल १८८२) हा मुळात जीवशास्त्रज्ञ आणि भूगर्भ शास्त्रज्ञ. HMS Beagle या जहाजावरुन तो पाच वर्षे जगाच्या विविध भागात फिरला. त्याने या प्रवासात खडक, माती, जीवाश्म, वनस्पती असे अनेक नमुने गोळा केले. याबाबतचं आपलं सविस्तर संशोधन त्यानं ‘The Voyage of the Beagle’ या ग्रंथातून जगासमोर आणलं.यानंतर ब-याच संशोधनांती त्यानं वर उल्लेख केलेला ‘Origin of Species’ (संक्षिप्त रुप) हा जगप्रसिद्ध ग्रंथ लिहिला.

डार्विनवर बोलण्याचा किंवा लिहिण्याचा माझा तीळमात्रही अधिकार नाही. मात्र सगळेच बोलतायत तर आपण मागे का? म्हणुन हे धाडस केलं. ‘माकडापासुन माणुस झाला’ असं त्यानं कुठेही म्हटलेलं नसताना ते त्याच्या नावावर खपवलं गेलं. मुर्खासारखे वाद घातले गेले… खरंतर त्याचा बहुतांश भर ‘Natural Selection’ (नैसर्गिक निवड) आणि ‘Struggle for Life’ (जगण्यासाठीचा संघर्ष) यावर होता. आजही आपण निर्मळ, पूर्वग्रहविरहित दृष्टीनं आणि जिज्ञासू वृत्तीनं या दोन्ही संकल्पनांचा बारकाईनं अभ्यास करायला हवा… बरीच कोडी सुटतील कदाचित…

— सतिश लळीत 

Avatar
About Guest Author 523 Articles
मराठीसृष्टीवर ज्या लेखकांनी स्वत:चे अकाऊंट बनवले नाही त्यांचे लेख या Guest Author द्वारे प्रकाशित होतात. आपले सर्व लेख एकत्रितपणे मिळवण्यासाठी स्वत:चे अकाउंट मराठीसृष्टीवर जरुर बनवा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..