दिग्दर्शक व पटकथाकार चेतन आनंद यांचा जन्म ३ जानेवारी १९२१ लाहोर येथे झाला. चेतन आनंद हे देव आनंद आणि विजय आनंद यांचे जेष्ठ बंधू.
अॅडव्होकेट पिसोरिलाल आनंद घराण्यात जन्मलेल्या चेतन आनंद यांनी लाहोर शासकीय महाविद्यालातून शिक्षण पूर्ण केल्यावर ते डेहराडूनचा डून स्कूलमधे शिकवू लागले. कथालेखनाची आवडच असल्याने त्यांना त्यांच्या कथेवर चित्रपट बनवण्याचा ध्येयाने मुंबईत घेऊन आली. त्यांची सम्राट अशोकवरील कथा ऐकून त्यावर चित्रपट बनण्याऐवजी दिग्दर्शक फणी मुजुमदार यांनी या देखणा, शार्प तरुणाला त्यांचा राजकुमार चित्रपटात नायकाची भूमिका ऑफर केली. अन अशाप्रकारे लेखक बनण्यास आलेले चेतन आनंद १९४४ साली राजकुमार या चित्रपटाचे नायक बनले. हा चित्रपट जरी तिकिटाचा खिडकीवर क्लीक झाला नाही तरी निराश न होता त्यांनी आता पटकथा लेखनाबरोबर दिग्दर्शनही करायचे ठरवले अन त्यातूनच ’नीचानगर’ या चित्रपटाची निर्मिती झाली.
ज्यामुळे अभिनेत्री कामिनी कौशल पुढे आल्या. १९४६ मधील चेतन आनंद यांचा या चित्रपटाला आंतरराट्रीय कान्स चित्रपटमहोत्सवात सर्वोत्कृट चित्रपटाचा जागतिक सन्मान मिळाला. ज्याला प्रख्यात सतारवादक पं.रवीशंकर यांचे चे संगीत होते.
आंतरराष्ट्रीय कान्स चित्रपटमहोत्सवाचे नामकरण पुढे ग्रॅण्ड प्रिंक्स असे झाले. चेतन आनंद हे हाडाचा दिग्दर्शक होते. पुढे चित्रपटात काम करण्याच्या इराद्याने आलेला देव आनंदने आपला थोरला भावाच्या मदतीने १९४९ साली निर्मिती क्षेत्रात पर्दापण करुन नवकेतन चित्रसंस्थेची रीतसर स्थापना करुन या बॅनरतर्फे आपला ’अफसर’ याचित्रपटाची निर्मिती केली. ज्यात त्याच्याबरोबर सुरैया नायिका होती व चेतन आनंदचे दिग्दर्शन होते. हा चित्रपट चांगला चालला. ज्यामुळे प्रोत्साहित होऊन चेतन आनंद यांनीच नंतर नवकेतनचा ’टॅक्सी ड्रायव्हर’ आणि ’आँधिया’ या चित्रपटाची निर्मिती केली. या दोन्ही चित्रपटांपैकी ’टॅक्सी ड्रायव्हर’ला चांगले यश मिळाले. नंतर मग गीताबालीसह नवकेतनचाच फंटुश हा देव आनंदचा चित्रपटही चेतन आनंद यांनीच दिग्दर्शित केला.
आपल्या कथाकल्पनेशी विचारांशी एवढेच नव्हे तर जीवनविषक तत्वज्ञानाशी एकनिष्ठ अन प्रामाणिक राहणाऱ्या चेतन आनंद यांचे पुढे नवकेतनशी जमू शकले नाही. कारण त्याच्याकडे देवआनंद सारखा पूर्णत: व्यावसायिक दृटिकोन नव्हता. तिकिटाचा खिडकीशी तडजोड ते कधीच करत नसल्याने अल्पावधीतच ते नवकेतनशी फारकत घेउन ते वेगळे झाले. एक उत्तम प्रतिभा शाली विचारवंत व सृजनशील दिग्दर्शकाचे त्याच्या विचारसरणीच्या आग्रहीपणामुळे कुणाशीच तसे पटणे अवघड होते. त्यांनी स्वत:ची स्वतंत्र चित्रसंस्था निर्माण केली. अन त्यांनी निर्मिलेला आणि दिग्दर्शित केलेला त्यांचा गाजलेला व नावाजलेला पुरस्कारप्राप्त चित्रपट म्हणजे १९६२ चा चिनी आक्रमणावर बेतलेला “हकीकत ” हा चित्रपट होय आजच्या भाषेत त्यात तत्कालीन सर्व आघाडीचे व नवोदित कलाकार असल्याने तो मल्टीस्टार असूनही त्यात कलाकारांपेक्षा परिस्थितीला महत्व होते.
बलराज सहानी, संजय, धम्रेद्र, जयंत, प्रिया राजवंश, विजय आनंद सारखे कलाकार व मदनमोहन यांची एकसे बढके एक सुरेल सुमधुर अजरामर गाणी. ज्यात ‘कर चले हम फिदा जानेमन साथियो” या गाणाचा राट्रीय गीतांचा सन्मान मिळाला. या चित्रपटासाठी ते कितीतरी दिवस तयारी करत होते. याच दरम्यान देव आनंद “गाईड” चित्रपटाची तयारी करत होते अन या चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांचा थोरला भावाने चेतन आनंद यांनी करावे अशी देवसाहेबांची उत्कट इच्छा होती. पण हकिकत चित्रपटाचे लडाख लेह भागात चित्रिकरणास नेमकी त्याच वेळेस संरक्षण खाताने परवानगी दिली. अन चेतन यांनी आपला “हकिकत” या ड्रीम प्रोजेक्टला सर्वोच्च प्राधान देत गाईड दिग्दर्शित करणास नकार दिला.
पण “हकिकत” हा भव्य कृष्ण धवल चित्रपट सुरु करणापूर्वी त्यांनी “किनारे किनारे “हा जयदेव यांचा फक्त संगीतामुळे स्मरणात राहिलेला देवआनंद मिनाकुमारीचा चित्रपट दिग्दर्शित केला होता. त्यांच्या हिमालय प्रॉडक्शन हाउसतर्फे त्यांनी ‘हकिकत’नंतर “आखरी खत”,हसते जख्म, हिररांझा, हिंदुस्थानकी कसम, कुदरत, हाथोकी लकिर आदि चित्रपट निर्माण केले ज्यामध्ये केवळ प्रिया राजवंश हीच नायिका असायची. चेतन आनंद यांनी त्यानंतर जवळपास दशकभरानंतर ‘हिंदुस्थान की कसम’ या युद्धपटाची निर्मिती व दिग्दर्शन केले.
पण मदन मोहन यांचे संगीत वगळता त्या चित्रपटात फारसा थरार नव्हता. त्यांच्या अखेरच्या पर्वात त्यांनी “जानेमन व साहेबबहादूर हे त्यांच्या नावलौकिकाला न शोभणारे चित्रपट दिले. “परमवीर चक्र” ही त्यांची दूरदर्शन मालिकाही याच काळात त्याना चांगले यश देउन गेली. नवकेतनचा “कालाबाजार”मधे प्रथमच चेतन आनंद, विजय आनंद व देव आनंद हे तिघे बंधू एकत्र चमकले. ज्यात चेतन आनंद यांनी एका निष्णांत वकिलाची भूमिका केली होती. तर गोल्डीने एका पळपुट्या प्रियकराची ..
चेतन आनंद हे त्यांच्या’ हकीकत’ या सिनेमासाठी या कथेला सूट होईल अशी नायिका ते शोधत होता. योगायोगाने गाठ पडलेल्या प्रिया राजवंश यांचे व्यक्तीमत्व त्याला खूप भावलं. त्यांनी थेट तिच्याशी संपर्क साधून त्यांना आपल्या सिनेमासाठी साईन केले. याचकाळाच चेतन आनंदच्या विवाहित आयुष्यात ब-याच अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्याची पत्नी उमा पासून ते विभक्त झाला होते. प्रिया राजवंश यांनी केवळ अभिनयच नव्हे तर कथा, पटकथा, संवाद आणि संकलन या सर्व कामात चेतन आनंद यांना मदत केली.
त्यामुळे हकीकतच्या चित्रीकरणादरम्यान या दोहोंत जवळीक वाढली. त्या दोघांच्या वयात बावीस वर्षांचे अंतर असूनही त्यांचे एकमेकावर निस्सीम प्रेम केले. वयातले अंतर त्यांच्या प्रेमात अडसर ठरले नाही. चेतनचे तिच्यावर प्रेम असले तरी इंडस्ट्रीत त्यांच्या नात्यास त्याने चर्चेचा विषय होऊ दिले नाही. त्या दोघांचाही लुक काहीसा ऑफबीट असल्याने त्यांच्या जोडीत विजोडपणा कधी वाटला नाही. ‘हकीकत’नंतर प्रिया आणि चेतन एकत्र राहू लागले होते. या दोघांनी लग्न केले नाही. मात्र बॉलिवूडमध्ये त्यांना पती-पत्नी म्हणूनच ओळखले जात होते. ‘हकीकत’नंतर प्रिया राजवंश यांना अनेक ऑफर आल्या. चेतन आनंद यांनी हयात असेपर्यंत त्याच्या प्रत्येक चित्रपटात प्रिया राजवंश यांना रोल दिले. चेतन आनंद यांनी हकीकत, आखरी खत, हीर राँझा, हसते जख्म असे चित्रपट दिले.
चेतन आनंद यांचे चिरंजीव केतन आनंद यांनी टूटे खिलौने हा चित्रपट आणि काही लघुपट तयार केले. चेतन आनंद यांच्या सर्व चित्रपटाना मदनमोहन यांचे संगीत व कैफी आझमी यांची गीतरचना असे. त्यांचे चित्रपट अत्यंत तरल,भावदर्शी व वास्तवाचे भान न हरपू देताही विलक्षण काव्यात्मक असत. मग तो “हिर रांझा”असेल वा “हसते जख्म..नीचानगर त्यांच्या “हकिकत”या चित्रपटाला १९६५ मधे सर्वोत्कृट चित्रपटाचा व्दितीय क्रमांकाचा राट्रीय सन्मान मिळाला. चेतन आनंद यांचे ६ जुलै १९९७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट/ दिलीप कुकडे