ओठावरले गीत माझे, आज कसे हे रुकून गेले,
गीतामधले शब्द रूकता, ओठ कसे हे सुकून गेले….।। धृ ।।
आकाशातील थवे पाहूनी,
चंचल माझी नजर झाली,
भिर भिरणाऱ्या दृष्टी पटावर
असंख्य चित्रे उमटूनी गेली ।
चित्र बघूनी जे मन नाचे,
पाषाणा परी स्थिर कां झाले….१
ओठावरले गीत माझे आज कसे हे रुकून गेले
गीतामधले शब्द रूकता ओठ कसे हे सुकून गेले
झूळझूळ वाहे सरिता पाणी,
पाण्यावरती दिसे तरंग,
हलके हलके भिजवी अंग,
पुलकीत करी रोम रोम जे
थंड आज परि होता दिसले….२
ओठावरले गीत माझे आज कसे हे रुकून गेले
गीतामधले शब्द रूकता ओठ कसे हे सुकून गेले,
सारे कांहीं तसेच आहे
सभोवतालचा निसर्ग ठेवा,
अंतर्मनही माझे आपले,
लुटीत असे जो सुखद मेवा ।
परि दोन्हीमधले अंतर ते
आज भासते दूर जाहले…३
ओठावरले गीत माझे आज कसे हे रुकून गेले
गीतामधले शब्द रूकता ओठ कसे हे सुकून गेले
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply