नवीन लेखन...

चाळा

परवा वपुं ची “पेन सलामत तो ..” ऐकत होते. हाताला असलेल्या चाळ्यांनी काय काय गडबड आणि गोंधळ होऊ शकतो याची फारच रंगतदार गोष्ट आहे. आपण काय करतोय हे हाताचे चाळे करणाऱ्याला कळातही नसतं आणि नंतर कधी कधी इतकी उस्तवार होते बोलता सोय नाही . मी लहान होते म्हणजे अगदीच पाच एक वर्षांची, आमच्या बाजूला एक छोटी गोड मुलगी होती, स्वाती नावाची. आम्ही सगळे एकलर चॉकलेटच्या सोनेरी चांदीचे छोटे छोटे बॉल्स बनवत बसलो होतो… त्या वयातल्या विरंगुळ्याच्या त्या गोष्टी! अचानक स्वाती रडायला लागली. आम्हाला काही कळेना. तेव्हढयात तिचा रडण्याचा आवाज ऐकून तिची आई आली, माझी आई आली. त्या दोघी तिला “वर बघ. नाकातून जोरात हवा बाहेर टाक. जोरात शिंक.” असे काही बाही सांगू लागल्या. आधीच रडत असलेली स्वाती अजूनच गोंधळली. शेवटी ती जोरात शिंकली .. एकदाची ! तशी तिच्या नाकातून एक सोनेरी बॉल, छोट्या मण्याच्या आकाराइतका बाहेर आला आणि तिच्या आईने “हुश्श ” केले. बाई साहेबांनी आम्ही जे सोनेरी गोळे करत होतो, त्यातला एक छोटासा उचलला आणि नाकात सरकवला. तिला त्याची चमकी करायची होती. ते ऐकल्यावर दोन्ही आयांनी कपाळाला हात लावले आणि अर्थात आमचा मौल्यवान खजिना, सगळ्या चांद्या आणि बॉल्स , कचऱ्याच्या डब्यात टाकून दिले.

माझ्या मुलाची मुंज होती. आदल्या दिवशी संध्याकाळी त्याची मावशी गिफ्ट म्हणून जरा हटके पण मुलांच्या क्रीटीव्हिटीला वाव देणारी अशी भेटवस्तू त्याच्यासाठी घेऊन आली, ती म्हणजे डफली. “आधीच मर्कट त्यातून मद्य प्याला ” अशी अवस्था झाली. माझी मुलं, भाचवंड सगळे एकत्र आले कि नुसता दंगा करतात. त्यांचा धुमाकूळ चालू असताना अचानक त्यांना हे नाविन्यपूर्ण खेळणं हातात आले. इकडे आम्ही कामात, गप्पात दंग.

आता डफली हातात आल्यावर त्यांनी वाजवून वाजवून डोकं भंडावून सोडणं अपेक्षित होत. पण दोनच मिनिटात एकदम शांतता झाली. माझा मुलगा रडकुंडीला आलेला. आणि बाकीचे एकदम गप्प. बघते तर त्याच्या गळ्यात डफली.
त्याचं झालं अस कि, आधीच ते मस्ती करत होते आणि डफली हातात आल्यावर तर चेकाळले. माझा भाचा फारच रंगात आला. त्याने नाचत नाचत ती डफली माझ्या मुलाच्या गळ्यात घातली. आता हा ती डफली काढायला गेला तर काही केल्या निघेना. सगळ्यांची मस्ती कुठच्या कुठे पळून गेली.

ती गळ्यात तर गेली पण बाहेर काही काढता येईना. आडवी, तिरकी सगळं करून बघितलं पण काढायला गेलं कि त्या डफळीच्या चकत्या त्याच्य कपाळाला , नाकाला घासत. डफली नवीन असल्यामुळे त्यांना धार पण होती.
आता मात्र मला पण टेंशन यायला लागलं. “उद्या मुंज ह्या मुलाची आणि आदल्या रात्री काय हा प्रकार. काय करावं . कशी बाहेर काढावी हि डफली .. ? ”

इकडे मुलगा घायकुतीला आलेला, त्याची पळापळ सुरूच होती आणि वर एकोणी बडबड “आई, आता काय करायचं ? डफली निघतच नाहीये. बहुतेक माझं ऑपेरेशनच करायला लागेल .. माझं डोक तर नाही ना कापावं लागणारं …. ”
आता मात्र शर्थ झाली. मी उसनं अवसान आणलं आणि त्याला पहिल्यांदा थांबवलं, पाणी प्यायला दिल. “अरे वेड्या, एवढं काही झालं नाहीये. आपण ती डफली कापून टाकूया. ” तेव्हा कुठे त्याचा जीव भांड्यात पडला.
मग मी हळूच माझ्या भाच्याला सांगितलं “तू आठव बर कशी घातलीस ती डफली त्याच्या गळ्यात ? कुठला अँगल होता?” सगळं शांत झाल्यावर भाच्याला पण धीर आला. त्याने हळूच ती ड फली फिरवली, तिरकी केली आणि एका ठराविक अँगलला धरून ती डफली अलगद बाहेर आली. त्या सरशी परत लागले खदखदायला. “उफ्फ “त्या एका सेकांदाच्या चाळ्यांनी अर्धा पाऊण तास सगळ्यांना इतका मनस्ताप झाला !!

मी काही कामानिमित्त बाजूच्या डेस्क वर बसलेले. आम्ही दोघी मिळून तिच्या स्क्रीन वर काही बघत होतो. बोलता बोलता सहज चाळा म्हणून मी अंगठी एका बोटातून दुसरी बोटात फिरवत होते. अचानक ती चाफेकळीत गेली आणि काही केल्या बाहेर येईना. मला काळत नाही जाताना जाते तर येताना तशीच बाहेर कशी येत नाही ? असो! पण मग मला आठवलं आई बांगड्या घट्ट होत असतील तर साबण लावून काढते. मी तडक बाथरूम मध्ये गेले हाताला साबण चोपडला आणि अंगठी काढायला लागले. पण ती ढिम्म . काही केल्या पेराच्या पुढे सरकेना. उलट साबण आणि पाणी लावल्यावर बोटच फुगल्यासारखं दिसायला लागलं. रडकुंडीला येऊन डेस्कशी आले आणि बघते तर बोटाचा रंग काळा निळा होतोयंस वाटलं. आता मात्र मला जामच टेन्शन यायला लागलं. काय करावं कळेना. माझ्या बाजूच्या मैत्रिणीला दाखवलं “अग हे बघ ना अंगठी अडकलीय. साबण लावला तर अजूनच जाम झालीये. काय करू बहुतेक बोटच कापावा लागणार कि काय? डॉक्टरांकडे जाऊ का?”

“अग येडी आहेस का. पहिल्यांदा सोनाराकडे जा. ते अंगठी कापून टाकतील. आहे काय नि नाही काय ?” मी तडक निघाले. रिक्षा पकडली. जवळच्या सोनार कडे गेले. त्याने एका मिनटात त्याच्या कडच्या पक्कडीने अंगठी कापली आणि माझे बोट सोडवले. मी पैसे देऊ केले तर तेही नाकारले . हसत हसत मला म्हणे, “अहो ताई, ती अंगठी या बोटात गेली तरी कशी ? केव्हढी लहान आहे . ” मी हसून थँक यू म्हणत उत्तर टाळलं , काय सांगणार . “हाताला चाळा ?”
हे किस्से वाचता वाचता तुम्हाला ह्या हातच्या चाळ्यांनी झालेले अजून जास्त गोंधळ आठवत असतील तर जरूर शेअर करा

– प्रेरणा कुलकर्णी 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..