छठपूजा ही नेपाळ, बिहार, झारखंड आणि उत्तर प्रदेशात मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येणारा सण आहे.
छट पूजा ही उत्तर भारतातील स्त्रिया करीत असलेली एक प्रकारची सूर्यपूजा आहे. छठ पूजा हा चार दिवसाचा उत्सव आहे. याची सुरुवात कार्तिक शुक्ल चतुर्थी ला होते व समाप्ती कार्तिक शुक्ल सप्तमी ला केली जाते. छटव्रत स्वीकारून ही पूजा करण्यात येते. या पूजेच्या दरम्यान छठ व्रती ३६ तास निर्जला उपवास करतात, व सूर्याला अर्घ्य देऊन हा उपवास सोडण्यात येतो. हे अतिशय कठीण व्रत मानले जाते. हे व्रत सौभाग्य व समृद्धीसाठी आणि संतानप्राप्तीसाठी करण्यात येते. या व्रता दरम्यान, सूर्य, सूर्यपुत्र यम व त्याची बहिण षष्टी हिचे पूजन केले जाते. संपूर्ण वर्षात चैत्र मासात व कार्तिक मासात अशी दोन वेळा छट पूजा करण्यात येते. पण कार्तिक महिन्यातील छट पूजेचे महत्त्व जास्त असते. छठ पूजाच्या प्रसादात ठेकुआ हा पदार्थ बनवण्याची पद्धत आहे.
ठेकुआची कृती.
साहित्य.
कणीक ५०० ग्रॅम, (नेहमीची). खोबर्यापचे लहान तुकडे किंवा किस २ चमचे, गूळ ३०० ग्रॅम, तूप, वेलदोडा पावडर अर्धा चमचा, पाणी २ कप.
कृती.
गूळ, पाणी व वेलदोडा पावडर एकत्र करुन याचे पातळ मिश्रण करुन घ्या. कणीक घेऊन त्यात ४ चमचे तूप, वर बनविलेले गुळाचे पाणी (आवश्यकते नुसार) व खोबरं घालून कणीक मळून घ्या व त्याचे छोटे-छोटे पेढे बनवा. आवडीचा साचा घेऊन हा पेढा त्यावर दाबून घेणे. पेढ्याला साच्याचा आकार आल्यावर त्याला तुपात लाल होईपर्यंत तळून घ्या. निथळून, पूर्णपणे थंड करुन सर्व्ह करा.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply