नवीन लेखन...

अरबी समुद्रातील शिवस्मारक

Chhatrapati Shivaji Maharaj Memorial in Arabian Sea

मुंबईच्या अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय स्मारकारचे भुमीपुजन येत्या शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असून या भुमीपुजनासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या देशभरातल्या १९ ठिकाणांवरील माती आणि विविध नद्यांचे पाणी आणले जाणार आहे. अरबी समुद्रातील शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा असलेले हे देखणे स्मारक साकारण्यासाठी तब्बल ३६०० कोटी खर्च केले जाणार असल्याची माहिती शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आणि आ. विनायकराव मेटे यांनी दिली. मुंबईतील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

आंतराष्ट्रीय दर्जाचे हे स्मारक गरगाव चौपाटीपासून ३.६ किलोमीटरवर समुद्रात असलेल्या एका पाण्याखालच्या दगडावरील १५.८६ हेक्टरवर उभारले जाणार आहे. जगप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांच्या हातून शिवरायांचा अश्वारूढ पुतळा साकारला जाणार आहे. या चौथऱ्यासहित या स्मारकाची उंची २१० मीटर उंच असून पुतळा १२६ मीटर, तर फक्त चौथऱ्याची ८४ मीटरचा असणार आहे. एकूण ३६०० कोटी रुपये खर्च करून हा प्रकल्प साकारला जाणार असून यापैकी पहिल्या टप्प्यात २५०० कोटींचा खर्च केला जाणार आहे. पहिल्या टप्प्याचे काम १९ फेब्रुवारी २०१९ ला पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न असून दुसऱ्या टप्प्यात उर्वरित ११०० कोटींचा खर्च केला जाणार आहे. समुद्रातील या स्मारकासाठी तांित्रक समितीचीही स्थापना करण्यात आली असून ईजीआयएस या फ्रान्सच्या कंपनीद्वारे स्मारकाचा आराखडा तयार केला जाणार आहे. येत्या दोन महिन्यांत कामाला सुरूवात होईल, अशी माहिती मा. मेटे यांनी दिली.

शनिवारी पंतप्रधानांच्या हस्ते या स्मारकाचा भुमिपुजन सोहळा पार पडत असून त्यासाठी महाराजांचे वास्तव्य असलेल्या शिवनेरी, रायगड, सिंधुदुर्ग, पन्हाळा, राजगड, प्रतापगड या गडकिल्ल्यांसह शिखर शिंगणापूर, तुळजापूर, सिंदखेड राजा, कराड, जेजुरी, देहू आळंदी, रामटेक, वेरूळ, नािशक, आग्रा, तंजावर आणि श्री शैलम या ठिकाणांवरून माती आणली जाणार आहे. यासह राज्यातील विविध नद्यांचे पाणी भुमीपूजनासाठी वापरले जाणार असल्याचेही मा. मेटे यांनी सांगितले. येत्या गुरूवारी (२२ डिसेंबर) या साऱ्या वस्तूंच्या कलशांचे मुंबईत आगमन होणार असून त्या कलशांचे भव्य स्वागत करण्यात येईल, असेही ते म्हणाले. तसेच २३ डिसेंबराला हे सर्व कलश गेट आॅफ इंडीया येथे आणण्यात येतील. भुमिपुजनाच्या दिवशी मुख्यमंत्री हे कलश पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हाती सुपूर्द करणार असून त्यांच्या हस्ते या कलशातील माती, दगड आणि पाण्याने भुमीपूजन सोहळा पार पडेल.

छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवनपट असेल स्मारकाचे आकर्षण

छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवनपट उलगडणारा अर्ध्या तासाचा लघुपट हे या स्मारकाचे आकर्षण असणार आहे. थ्री डी आणि फोर डीच्या सहाय्याने शिवकालीन वातावरणाची निर्मिती करणारा एक लाईट व साऊंड शोही या ठिकाणी सादर केला जाणार आहे. याशिवाय दररोज दोनशे कलाकाराच्या माध्यमातून राज्यभिषेकाचा प्रसंगही सादर केला जाणार असून स्मारकाच्या ठिकाणी दोन जेटींसह हेलीपॅडही उभारले जाणार आहे. या शिवाय येणाऱ्या पर्यटकांसाठी उपहारगृह तसेच वैद्यकीय सेवेची व्यवस्थाही करण्यात येणार आहे.

स्मारकाची वैशिष्ट्ये

जलदुर्गाशी साध्यर्म असणारी दगडातील समुद्र तटबंदी.
आई तुळजाभवानी मंदीर.
कला संग्रहालय.
ग्रंथ संग्रहालय.
मत्स्यालय
अॅम्पिथिएटर / हेलीपॅड.
आॅडीटोरीअम.
लाईट व साऊंड शो.
विस्तीर्ण बाग बगीचे.
रुग्णालय
सुरक्षा रक्षक निवासस्थाने.
आयमॅक्स सिनेमागृह.
प्रकल्प स्थळ ठिकाणी २ जेट्टी.
चौथऱ्यामध्ये वेगवेगळ्या मजल्यावरून दृश्यावलोकनासाठी सोय.
पर्यटकांना प्रकल्प स्थळाकडे जाण्यासाठी गेट वे आॅफ इंडीया, नवी मुंबई व इतर ठिकाणाहून जाण्याची व्यवस्था
स्मारक ठिकाणी शिवकालिन वातावरण निर्मिती

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..