नवीन लेखन...

छत्रपतींच्या नावावर “अशाप्रकारे” कोटींच्या कोटी उड्डाणे नकोत.

छत्रपती शिवाजी महाराज हे साहित्यकार, नाटककार, चित्रपट निर्माते, कलाकार, शिल्पकार, शाहीर यांच्या स्फूर्तीचे स्रोत आहेत. शिवाजी महाराजांच्या जीवनावर अनेक अजरामर कृती, केवळ मराठीतच नव्हे तर इतरही भाषांत प्रकाशित झाल्या आहेत व इथून पुढच्या काळात येत ही राहतील. पूर्वीच्या काळी पुस्तके, कादंबऱ्या, व्याख्याने ह्या माध्यमांद्वारे छत्रपती घराघरात पोहचवले गेलेत परंतु जसा काळ बदलला तशी ही माध्यमे देखील बदललीत, सध्या चित्रपट, वेब सिरीज, इंटरनेट या माध्यमांद्वारे छत्रपतींच्या आयुष्यावर आधारित बरेच सिनेमे व मालिका आल्यात व घराघरात लोकप्रिय देखील झाल्यात.

छत्रपती शिवाजी महाराज हे तमाम हिंदुस्थानातील असंख्य भारतीयांचे श्रद्धास्थान व तसेच भावनिक विषय आहे, त्याचमुळे छत्रपतींवरील आधारित चित्रपट हे तिकीट बारीवर अक्षरशः धुमाकूळ घालत आहे. या सिनेमाच्या माध्यमातून महाराष्ट्राचा इतिहास साऱ्या जगभरात पोहोचत असला तरी, ज्यांनी महाराजांचा इतिहास वाचला आहे त्यांना हे असे सिनेमे पाहताना अनेक गोष्टी खटकतात किंवा खटकू शकतात. सत्यघटनेवर बेतलेल्या या सिनेमांना सिनेमॅटिक लिबर्टी घेणं योग्य आहे का हा मूळ मुद्दा आहे. कोणताही चित्रपट तयार करताना सिनेमॅटिक लिबर्टीचा वापर केला तर त्यात काही गैर नाही, पण याच लिबर्टीच्या नावाखाली दिग्दर्शक सत्य घटना, त्याची मांडणी कशी काय बदलू शकतो हाही प्रश्न पडतो.

सध्या युवराज छत्रपती संभाजी महाराज यांनी पुढाकार घेऊन पुढे येऊ घातलेल्या काही छत्रपती वरील आधारित चित्रपटावर काही गंभीर आक्षेप घेतलेत व माझ्या लेखी ते योग्य देखील आहेत. इतिहासावर कोण्या एका व्यक्तीची मक्तेदारी नाही. त्यामुळे चित्रपटांच्या निमितानं पडद्यावर इतिहास जिवंत होणार असेल, तर चांगलंच आहे. परंतु, हा इतिहास सिनेमात मांडताना मूळ इतिहास दिग्दर्शक, लेखकानं जपणं महत्त्वाचं आहे. परंतु कोटींच्या कोटी उड्डाने घेण्यासाठी इतिहासात नसलेल्या गोष्टी किंवा आहेत त्या खूपच अतिरंजित करून अशा चित्रपटात दाखविल्या जातात. आपल्या इतिहासात भरपूर नाट्यमय घटना आहेत; त्यामुळे आपण त्यात आणखी चार गोष्टी घालून, त्याचा अतिरेक करण्याची गरज नाही. इतिहास हा आपल्यासाठी केवळ विषय नाही, तर भावभावनांशी जोडलेला आणि जगण्याचा मूळ पाया आहे. सध्याचे महाराष्ट्र सरकार व मा. राजसाहेब ठाकरे या सर्व चित्रपट सृष्टीच्या मागे भक्कम पणे उभे आहेत हे बऱ्याचदा दिसून आले आहे व ही खूपच उत्साहवर्धक बाब आहे, परंतु त्यांनी देखील या बाबींकडे लक्ष देणे गरजेचे आहेत.

माझं तर मत असे आहे की, हे दिग्दर्शक आणि निर्माते छत्रपती वर आधारित चित्रपटातून कोटींच्या कोटी कमावणार असतील तर त्यांनी खर्च व अपेक्षित फायदा झाल्यानंतर उरलेली रक्कम हे गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी द्यावेत. आपण सर्व जन जाणतोच की छत्रपती हे आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान आहेत त्यामुळे त्यावर आधारित चित्रपट पाहण्यासाठी गर्दी करतो व ती केलीच पाहिजे आणि चित्रपट सुपरहिट होतात, परंतु सध्या दिग्दर्शक आणि निर्मात्यानी छत्रपतींचे विषय हाती घेऊन चित्रपट बनवून पैसे कमावण्याचे सोपे माध्यम तर केले नाहीय ना अशी शंका घेण्यास वाव आहे.

शेवटी एकच सांगायचं आहे छत्रपती शिवाजी महाराज ही एक भावना आहे. ती “जपा” आणि “टिकवा”. महाराष्ट्र धर्म घडवा…

— श्री. राहुल अविनाश कळंके
वैजापूर, जि. संभाजीनगर

Avatar
About राहुल अविनाश कळंके 2 Articles
मी गेल्या दहा वर्षांपासून नामांकित CBSE शाळेत शिक्षक आहे. मला सध्याच्या सामाजिक प्रश्नांवर माझी मते मांडायला आवडतात. मी विविध वृत्तपत्रांसाठी अनेक छोटे लेख लिहिले. माझे विचार मोठ्या प्रमाणावर लोकांपर्यंत पोहोचवण्याचा माझा लेखनाचा हेतू आहे. मी एक शिक्षक म्हणून काम करत असल्यामुळे मला वेगवेगळ्या वयोगटातील लोक भेटतात, त्यामुळे मला समाजातील वर्तमान समस्यांवर प्रकाश टाकण्याची प्रेरणा मिळते.
Contact: Facebook

2 Comments on छत्रपतींच्या नावावर “अशाप्रकारे” कोटींच्या कोटी उड्डाणे नकोत.

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..