चिकू मुख्यत्वे करून महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, उत्तर प्रदेश व पश्चिम बंगाल या प्रदेशात होतो. पूर्व महाराष्ट्रात फक्त ठाणे, रायगड जिल्ह्यात समुद्रकिनारपट्टीत लागवड करतात. वास्तविक पाहता चिकूचे झाड अमेरिकेतून आपल्याकडे आलेले आहे. आपल्याकडे झाडाचा उपयोग केवळ फळासाठी करतात पण काही देशात त्यांच्या पांढऱ्या शुभ्र व घट्ट चिकाचा उपयोग च्युईंगमसाठी करतात. म्हणून भारतात चिकूची लागवड फार मोठ्या प्रमाणात संबंध भारतात केली जाते. कारण चिकू हा भारतात अत्यंत गोड पदार्थ विक्री करीता तयार होतो.
चिकू हे अत्यंत पौष्टिक फळ असून त्यात भरपूर जीवनसत्त्व अथवा खनिज द्रव्ये असतात आणि यात अपचनास मदत होते. तसेच यात कॅल्शियम अथवा पोटॅशियम याचा मुख्यत्वे करून जास्त फायदा होतो. चिकूचे अनेक पदार्थ खाण्यातही करतात.
पण त्याचबरोबर चिकूचा सॅलडमध्येही वापर करतात. तसेच चिकूचे मिल्कशेकही बनविता येतात. हा पौष्टिक चिकू भारतात सगळीकडे आढळतो.
– मदन देशपांडे
Leave a Reply