नवीन लेखन...

बालदिन

भारतात हा दिवस पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती निमित्त साजरी केला जातो. या दिवशी लहान मुलांचे अधिकार, त्यांचा संभाळ आणि शिक्षण या बद्दल जागरूकता पसरवली जाते. पंडित नेहरूंचे लहान मुलांवर अतिशय प्रेम होते यासाठी १४ नोव्हेंबरचा दिवस बालदिन म्हणून साजरी करतात.

पंडित नेहरूंना यासाठी चाचा नेहरू म्हणून संबोधले जात होते. पडिंत नेहरू यांनी लहानमुलांच्या शिक्षणावर आणि संभाळावर अधिक भर दिला होता. लहान मुले म्हणजे देशाचे भविष्य असे ते म्हणत. यासाठी देशाचे भविष्य जर उज्वल करावयाचे असेल तर मुलांच्या शिक्षणावर अधिक लक्ष देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यांचा आदर्श म्हणून आजही बालदिवस देशभरात मोठ्या जोमाने साजरी केला जातो.

१९२५ सालापासून बालदिन साजरा केला जात आहे. १९५३ मध्ये बालदिनाला जगभरात मान्यता मिळाली होती. संयुक्त राष्ट्र संघाने बालदिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली होती. इतर देशांप्रमाणे भारतातही हा दिवस २० नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात येत होता. मात्र, १९६४ मध्ये देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे निधन झाले. त्यांची जयंती बालदिन म्हणून साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर भारतात १४ नोव्हेंबर रोजी बालदिन साजरा केला जातो.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..