चिंगी
‘पहाट झाली,
चिव चिवते चिमणी
उमज येईना,
उठविले तिजला कोणी…..१,
आई आहे कां ?
जी उठवी शाळेसाठी,
गुदगुदल्या करूनी
कुरवाळिते हळूंच पाठी….२,
घड्याळ उठवी
घण घण करूनी नाद
घरट्यामधुनी,
नाही ऐकला असा निनाद.’..३,
चिमणी –
‘ उषाराणी येते,
साऱ्यांची आई बनूनी
प्रेमानें मोडी झोंप,
नाजूक करकमलांनी…..४,
घड्याळ आमचे,
दवबिंदू पडतां पानावरूनी
चाळविती निद्रा,
टपटप आवाज करूनी’ …..५
— डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply