नवीन लेखन...

चीनने केलेल्या २०१५ मधील निर्यातीची आकडेवारी.

Chinese Exports in 2015

China’s Top Import Partners Although historically nicknamed The Middle Kingdom, China could easily be called the Land of Big Exporting. The world’s largest exporter, China’s Top Import Partners China shipped US$2.282 tr…www.worldstopexports.com

सध्या बऱ्याच पोस्ट पाहतो आहे, चायनीज वस्तूंवर बहिष्कार टाका अशा आशयाच्या. सद्य परिस्थिती पाहता, देशप्रेमाच्या लाटेत ते योग्य वाटेलही. परंतु, इथेही आपली फसगत होणार आहे अज्ञानामुळे.

थोडं विषयांतर होईल, पण पर्याय नाही.

चीनने केलेल्या २०१५ मधील निर्यात व्यापाराची ही आकडेवारी.
United States: US$410.8 billion (18% of total China exports)
Hong Kong: $334.3 billion (14.6%)
Japan: $135.9 billion (6%)
South Korea: $101.5 billion (4.4%)
Germany: $69.2 billion (3%)
Vietnam: $66.4 billion (2.9%)
United Kingdom: $59.7 billion (2.6%)
Netherlands: $59.6 billion (2.6%)
India: $58.3 billion (2.6%) Singapore: $53.1 billion (2.3%)
Taiwan: $45.1 billion (2%)
Malaysia: $44.2 billion (1.9%)
Australia: $40.4 billion (1.8%)
Thailand: $38.3 billion (1.7%)
United Arab Emirates: $37.1 billion (1.6%)
Ref: http://www.worldstopexports.com/chinas-top-import-partners/

अर्थात, भारताचा चीनच्या निर्यातीमधला वाटा आहे २.६%
म्हणजे समजा आपण चीनच्या सर्व मालावर बंदी घातली तरी आपण चीनचे फारसे नुकसान करू शकत नाही. देश पातळीवर २.६% हे देखील खूप असतात. पण एकंदरीत आपले “उपद्रव मूल्य” यात कमीच आहे.

हे देखील लक्षात घेतले पाहिजे की, भारत फक्त चीनमधून वस्तू आयातच करतो असे नाही, तर चीनला निर्यात देखील करतो. त्याची आकडेवारी देत नाही, इंटरनेट वर शोधू शकता. पण ती इथे फारशी महत्त्वाची नाही.

भारताची निर्यात आकडेवारी.
United States: US$40.4 billion (15.3% of total India exports)
United Arab Emirates: $30.3 billion (11.5%)
Hong Kong: $12.2 billion (4.6%)
China: $9.5 billion (3.6%) United Kingdom: $8.9 billion (3.4%)
Singapore: $7.8 billion (2.9%)
Germany: $7 billion (2.7%)
Saudi Arabia: $7 billion (2.6%)
Sri Lanka: $5.5 billion (2.1%)
Bangladesh: $5.5 billion (2.1%)
Vietnam: $5.3 billion (2%)
Belgium: $5 billion (1.9%)
Malaysia: $4.9 billion (1.9%)
Netherlands: $4.9 billion (1.8%)
France: $4.8 billion (1.8%)
Ref: http://www.worldstopexports.com/indias-top-import-partners/

म्हणजे चीनचा भारतातील निर्यातीमधील वाटा आहे ३.६%. आपण जेवढी आयात करतो त्यापेक्षा कमी निर्यात करतो. म्हणजे आपण तोट्यात आहोत. याला म्हणतात trade deficit, जे मागील वर्षी ३४% होतं.

या शिवाय, दोन्ही बाजूचा म्हणजे आयात-निर्यात व्यापाराचा विचार केल्यास चीन हा भारताचा सर्वात मोठा व्यापारातला भागीदार आहे.
Ref: https://en.wikipedia.org/wiki/List_of_the_largest_trading_partners_of_India

सारांश सांगायचा तर या क्षणाला भारत-चीन व्यापार बंद केला तर त्याचा सर्वात मोठा फटका भारताला बसेल.

एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की, व्यापार ही परस्परावलंबीत्वावरून निर्माण होतो. याला सहजीवनही म्हणता येईल.

दुसरे असे की, आजच्या काळात, व्यापार हे एक शस्त्र म्हणून देखील वापरता येते. अनेक देशांनी ते वापरलेही आहे. चीन अमेरिकेस सध्या धमकावतो ते याच शस्त्राने. चीनने त्याचा डेमो अमेरीकेस दाखवला आहे. भारतावरही चीन हे शस्त्र उगारू शकतो.

आता मुळच्या मुद्द्याकडे पाहू. चीनी मालावर बंदी घालायची म्हणजे काय?

चीन भारतात जी निर्यात करतो, त्यात सर्वात जास्त वाटा इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा आहे. कॉम्पुटर, मोबाईल, टीव्ही, Integrated Circuits, Semiconductor Devices आणि अशा अनेक वस्तू. सध्या केवळ यापुरते पाहू.
कॉम्पुटर आणि मोबाईल (यात विशेषकरून स्मार्टफोन) मध्ये भारत अजूनही पूर्णपणे स्वावलंबी नाही. म्हणजे तुम्ही कोणताही कॉम्पुटर किंवा स्मार्टफोन घ्या, त्यात चायनीज पार्ट असणारच.

इथे थोडी भारतीय मानसिकताही विचारात घ्यावी लागेल. भारतीय बाजारपेठेत स्वस्त वस्तू खपतात, दर्जेदार नाही. लक्षात घ्या की चीन दर्जेदार वस्तूही बनवतो. पण त्या युरोप, अमेरिकेत जातात. भारतात कमी दर्जाच्या, स्वस्त वस्तू येतात. कारण भारतीय खरेदीदारांची मानसिकता. दर्जात तडजोड करून स्वस्त वस्तू बनवण्यात चीनचा हात कोणी धरू शकत नाही.

आता याचा अर्थ असा घ्यायचा का की नागरिक म्हणून आपण काहीच करू शकत नाही? तर असं नाही.
देशप्रेमाचे प्रतिक म्हणून शक्यतो चायनीज वस्तू घेणे टाळा हे योग्यच. त्याने निदान स्थानिक लोकांच्या उद्योगाला चालना मिळेल.
पण चीनला उत्तर थोडं वेगळ्या पद्धतीने द्यावं लागेल. म्हणजे “भारताला स्वावलंबी बनवणे”. जे इलेक्ट्रॉनिक भाग भारतात बनत नाहीत, ते भारतात बनवणे.
हे करणार कोण? सरकार? नाही.
“हे” आपल्याला करावे लागेल. नागरिक म्हणून आपली जबाबदारी असेल ती ही.

मोदींनी अशा अनेक बाबी हेरूनच Make In India चळवळ चालू केली. त्याला प्रतिसाद द्या. नागरिक म्हणून फक्त खरेदीदाराच्या भूमिकेत राहू नका, उत्पादकाच्या भूमिकेत शिरा. फेसबुक आणि WhatsApp वर पोस्ट टाकण्याइतके हे सोपे नक्कीच नाही. पण हाच योग्य उपाय आहे देशप्रेम दाखवण्याचा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..