ज्याचे चिंतन आम्हीं करितो
तोच ‘शिव ‘ ध्यानस्थ भासतो
स्वानुभवे चिंतन करुनी
चिंतन शक्ति दाखवितो १
जीवनाचे सारे सार्थक
अन्तरभूत असे चिंतनांत
चिंतन करुनी ईश्वराचे
त्याच्याशी एकरुप होण्यात २
सारे ब्रह्मांड तोच असूनी
अंश रुपाने आम्हीं असतो
जेव्हां विसरे बाह्य जगाला
तेव्हांच तयात सामावितो ३
चिंतन असे निश्चीत मार्ग
प्रभुसंपर्क साधण्याचा
लय लागूनी ध्यान लागतां
आनंदीमय होण्याचा ४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bbknagapurkar@gmail.com
Leave a Reply